KAPUS BAJARBHAV एका दिवसात कापसाचे भाव 400 रुपयांनी वाढले ; कापसाची 8000 रुपयांकडे वाटचाल.

WhatsApp Group Join Now

KAPUS BAJARBHAV यंदा कापूस हंगामाच्या निच्चांकी दराने विक्री होत असताना मागील आठवड्याभरापासून कापूस दरात दररोज सुधारणा होत आहे. गेल्या आठवड्यात 7000 रुपयांच्या खाली विक्री होत असलेला कापूस या आठवड्यामध्ये 7000 रुपयांपेक्षा अधिक दराने विक्री होत आहे. व बाजारातील कापूस बाजार भाव तज्ञांच्या मते कापसाचे दर 8000 किंवा 8000 च्या वरती देखील जाऊ शकतात.

कापूस दरवाढी मागील कारण.

राज्याबरोबर देशात दबवात असलेला कापूस मागील आठवडाभरापासून 7000 ते 7500 रुपये प्रति क्विंटल च्या दराने विक्री होत आहे. एका आठवड्यामध्ये दरात एवढी सुधारणा होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे भारतीय कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली मागणी आणि मिळत असलेला सर्वोच्च दर्जा. व दुसरे प्रमुख कारण म्हणजे बाजारपेठेमध्ये कापसाची घटती आवक. यामुळे सध्या कापूस दरात सुधारणा पाहिले मिळत आहे.

हे पण वाचा :- कृषि विभागाची विशेष मोहिम पूर्ण ;अवघ्या दोनच दिवसात होणार दूसरा हाफ्ता जमा..!

एका दिवसात चारशे रुपयांची सुधारणा.

राज्यात कापूस वेचणी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे व शेतकऱ्यांकडे घरात कापूस अजून देखील शिल्लक आहे. ज्या शेतकऱ्यांनी किरकोळ खर्चासाठी कमी दरात कापसाची विक्री केली त्यांना आता पश्चाताप होत आहे. सध्या बाजारात शेतकरी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 21 फेब्रुवारी बुधवारी मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड मध्ये कापसाची बऱ्यापैकी आवक झाली व कापसाला 7200 ते 7600 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळाला.

सीसीआयच्या कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ.

हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी सीसीआय च्या कापूस खरेदी केंद्रावर कापसाची विक्री केली परंतु सीसीआय शेतकऱ्यांकडून हमीभावाने कापूस खरेदी करते व कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना पीक पेऱ्याची अट असल्यामुळे व सद्यस्थितीला बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना हमीभाव अपेक्षा 400 ते 500 रुपयांनी मिळत असलेला अधिक भाव यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआयच्या कापूस खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

हे पण वाचा :- आज या बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात विक्रमी वाढ ; पहा आजचे कांद्याचे भाव..!

कापूस 8000 रुपयांचा टप्पा गाठण्याचे संकेत.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची वाढलेली मागणी पाहता व बाजारपेठेमध्ये होत असलेली कापसाचे कमी आवक लक्षात घेता शेतकऱ्याने जर असाच टप्प्याटप्प्याने कापूस विक्री केला तर कापूस दरातील ही तेजी कायम राहू शकते आणि कापूस पुन्हा एकदा 8000 रुपयांच्या पुढे विक्री होऊ शकतो असा अंदाज कापूस बाजार भाव तज्ञांनी व्यक्त केला आहे.

आजचे बाजार समिती मधील कापसाचे दर.
बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
परशिवानी  1222 6500 6900 7200
अकोट  3899 6700 6900 7300
अकोला  433 6900 7100 7500
वर्धा  644 6500 6788 7277
किल्ले धारुर  899 6900 7100 7300
मानवत  544 6400 6698 6999
लासलगांव  1001 6700 6900 7100
सिल्लोड  1144 6700 6900 7100
उमरेड  2133 6900 7100 7100

Leave a Comment