Kharip Pik Vima 2023 दुष्काळग्रस्त 40 तालुक्यात उर्वरित 75 टक्के विमा वाटप सुरू ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश.

WhatsApp Group Join Now

Kharip Pik Vima 2023 राज्यात रब्बी हंगामामध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने ४० तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. आणि आज या दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांसाठी राज्य शासनाने निधी वाटप करण्यास परवानगी दिली आहे.व याबद्दलचा शासन निर्णय देखील निर्गमित केला आहे. तर मग ते कोणते 40 तालुके आहेत आणि या तालुक्यामधील पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी प्रति लाभार्थी किती अनुदान मिळेल आजच्या लेखात सविस्तरपणे जाणून घेऊया.

काय आहे आजचा शासन निर्णय.

Kharip Pik Vima 2023 महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक २९ फेब्रुवारी 2024 रोजी खरीप हंगाम 2023 मधील 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड किंवा दुष्काळामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानी करिता निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता राज्य शासनाचा निधी वितरित करण्यास आज मान्यता देण्यात आली आहे.

📢 हे पण वाचा :- आता मागेल त्याला घरकुल ; नवीन शासन निर्णयानुसार ३ लाख घरकुलाना मंजूरी,आजच करा अर्ज..!

आजच्या शासन निर्णयामधील संपूर्ण माहिती.

Kharip Pik Vima 2023 राज्य सरकारकडून राज्यात अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर परिस्थिती व गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरिता एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निविष्ठा अनुदान स्वरूपात बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत वितरित करण्यात येते.

शेतकऱ्यांसाठी मिळणार वाढीव अनुदान.

महाराष्ट्र राज्यामध्ये जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानी करिता दोन ऐवजी तीन हेक्टर च्या मर्यादेमध्ये राज्य शासनाकडून मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.

📢 हे पण वाचा :- वयोवृद्धांसाठी 4 मोठ्या योजना ; ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 20 हजार रुपये पगार..!

राज्य शासनाची दुष्काळी तालुक्यांसाठी विशेष घोषणा.

राज्यात खरीप हंगामात 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने व 33% पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेल्या 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. व या दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या 40 तालुक्यातील खातेदारक शेतकऱ्यांना कृषी विषयक मदतीसाठी राज्य शासनाची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.Kharip Pik Vima 2023

दुष्काळी अनुदानासाठी एवढ्या निधीची घोषणा.

खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत वितरित करण्यासाठी आजच्या शासन निर्णयानुसार 2443 कोटी 22 लाख 71 हजार एवढ्या निधीचे वितरण करण्यात राज्य शासनाने परवानगी दिली आहे.

Leave a Comment