खुशखबर..! या जिल्ह्यातील लोकांना किराणा दुकानासाठी ८५% अनुदान, योजनेसाठी आजच अर्ज करा. kirana shop subsidy.

WhatsApp Group Join Now

kirana shop subsidy राज्यातील नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी व त्यांचे उत्पन्न वाढवून जीवनमान सुधारावे यासाठी राज्य सरकार विविध स्तरातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे. जा अंतर्गत महिलांसाठी शिलाई पिको फॉल मशीन, तर शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर व उपसाधने आणि आता राज्यातील नागरिकांना किराणा दुकान टाकण्यासाठी राज्य शासन 85 टक्के पर्यंत अनुदान वितरित करत आहे. मग काय आहे ही योजना व या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा व तुम्हाला अनुदानाचा लाभ कसा मिळेल आजच्या या लेखात संपूर्ण आणि सविस्तरित्या जाणून घेऊया.

काय आहे ही नवीन योजना.

kirana shop subsidy. महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत न्यूक्लिअर बजेटनुसार विविध योजना राबवल्या जातात. ज्या अंतर्गत किराणा दुकानासाठी तब्बल 85% अनुदानाचे वितरण केले जाते. या योजनेच्या माध्यमातून आदिवासी प्रवर्गातील नागरिकांना जगण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

📢 हे पण वाचा :- मिनी ट्रॅक्टर योजनेच्या अनुदानात वाढ ; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन-अजित पवार..!

आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत च्या इतर योजना.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत आदिवासी नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. ज्यामुळे आदिवासी नागरिकांचे व्यावसायिक जीवनमान सुधारण्यास मदत होते. या अंतर्गत सायकल दुकान, झेरॉक्स सेंटर, महिलांसाठी पिको फॉल शिलाई मशीन तर आता हॉटेल आणि किराणा दुकानासाठी 85% अनुदान वितरणाची योजनेअंतर्गत तरतूद आहे.

कोणाला मिळतो योजनेचा लाभ.

आदिवासी विकास प्रकल्प योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना या फक्त आदिवासी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राखीव आहेत. या अंतर्गत कोणताही आदिवासी व्यक्ती किंवा महिला योजनेचा लाभ घेऊ शकते. फक्त संबंधित लाभार्थी हा कोणत्याच शासकीय सेवेत कार्यरत नसायला हवा. kirana shop subsidy.

📢 हे पण वाचा :- राज्यात 100% अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन चे वाटप ; आजच अर्ज करा..!

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, बँक पासबुक, राशन कार्ड व पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित प्रकल्प कार्यालयाशी लाभार्थ्याला संपर्क साधायचा आहे व योजनेसाठी अर्ज दाखल करायचा आहे. kirana shop subsidy.

Leave a Comment