शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत मिळवा तात्काळ लाखो रुपयांचे पीक कर्ज. Kisan credit card loan scheme.

WhatsApp Group Join Now

Kisan credit card loan scheme. देशात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांनी एकत्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी किसान क्रिकेट कार्ड योजनेची घोषणा केली व या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याच अंतर्गत आपण या लेखात जाणून घेणार आहोत की किसान क्रेडिट कार्ड काय आहे? त्या अंतर्गत किती रुपयांचे कर्ज मिळते? या कर्जासाठी कोण पात्र असतील? यावर किती टक्के व्याजदर असेल? सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कर्ज कसे घ्यायचे? सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आज आपण या लेखात जाणून घेऊया.

काय आहे किसान क्रेडिट कार्ड?

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत समावेश करून त्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जात आहे. या कार्डद्वारे शेतकरी तात्काळ आपल्या शेतीवर पीक कर्ज घेऊ शकणार आहे. च्या अंतर्गत पेरणीसाठी, अवजारे खरेदीसाठी, पशुधन खरेदीसाठी व शेतीमधील इतर कामासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

काय आहेत किसान क्रेडिट कार्ड च फायदे?

शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस लागणारी बी बियाणे, रासायनिक खते व त्यानंतर कीटकनाशके यांच्या खरेदीसाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज दिले जात जाते. तसेच पीक कापणीनंतर लागणारा खर्च व शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणारा खर्च भागवण्यासाठी या कार्ड अंतर्गत कर्ज मिळते त्यामुळे शेतकऱ्याला इतर कोणत्याही ठिकाणी हात पसरवण्याची गरज पडत नाही.
तसेच शेतीसोबत दुग्ध व्यवसाय व पशुपालनाचा व्यवसाय करण्यासाठी पशुधनाची खरेदी करणे, शेती अवजारे खरेदी करणे व देखभाल करण्यासाठी या किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करून दिली जाते.

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गतची व्याज पद्धती.

किसान कार्ड योजनेअंतर्गत दिली जाणारी 3 लाख रुपयांपर्यंतची पीक कर्ज यासाठी 7% व्याजदर ग्राह्य धरला जात आहे परंतु यामध्ये देखील आता 3% सूट देऊन केवळ 4% व्याजदराने या कार्ड अंतर्गत कर्ज दिले जाते.Kisan credit card loan scheme.
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत खरिपाच्या पिकासाठी घेतलेले पीक कर्ज हे आपल्याला पुढील मार्च महिन्यापर्यंत परतफेड करावी लागते.
तसेच जर रब्बी हंगामातील पिकासाठी पीक कर्ज घेतले असेल तर ते शेतकऱ्याला पुढील जून महिन्यापर्यंत परतफेड करावे लागते.
तसेच जर शेतकऱ्यांनी बागायती पिकासाठी पीक कर्ज घेतले तर त्याला हे पीक कर्ज पुढील सप्टेंबर महिन्यापर्यंत परतफेड करावे लागते. तसेच संबंधित बँकेकडून पीक कर्ज घेते वेळेस या बँकेकडून देखील कर्ज वितरण सदर्भातील आणि कर्ज परतफेड संदर्भातील शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली जाते.

किसान क्रेडिट कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे?

किसान क्रेडिट कार्ड साठी नोंदणी करू इच्छित असणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा व आठ अ चा उतारा, याआधी अन्य कोणत्या बँकेतून पीक कर्ज घेतले नसल्याचे शपथपत्र, शेतकऱ्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड व तीन पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रांसहित तुम्ही तुमच्या शेजारील महा इ सेवा केंद्रातून अर्ज करू शकता किंवा ऑफलाइन पद्धतीने देखील तुम्ही थेट बँकेमध्ये अर्ज दाखल करू शकता.

किसान क्रेडिट कार्ड साठीची पात्रता व अटी ?

क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत जमिनीचा मालकदार शेतकरी, भाडेकरू शेतकरी, संयुक्त कर्जदार व संयुक्त शेतकरी देखील कर्जाचा लाभ होऊ शकतो. भाड्याने शेती करणारे शेतकरी, भाडेपट्टीदार किंवा पिकाची वाटणी करून शेती करणारे शेतकरी देखील योजनेचा लाभ घेऊ शकता. तसेच महत्त्वाचे म्हणजे किसान क्रेडिट कार्ड साठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या पात्रता यादी मध्ये असणे आवश्यक आहे.

पी एम किसानची पात्र लाभार्थी यादी कशी पहावी?

पी एम किसानची पात्र लाभार्थी यादी आपल्या मोबाईल वरून शेतकरी पाहू शकतो यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलच्या गुगलमध्ये pmkisan.gov.in ही वेबसाईट उघडायची आहे.
 या वेबसाईट मध्ये फार्मर कॉर्नर या टॅबला ओपन करून बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवर जायचं आहे.
यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल या पेज मध्ये तुम्हाला तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचा ब्लॉक व शेवटी तुमचे गाव निवडून तुमच्या गावातील पात्र लाभार्थ्यांची यादी डाऊनलोड करायची आहे.Kisan credit card loan scheme.

Leave a Comment