शेतकऱ्यांना मागेल त्याला व हवे तेवढे पीक कर्ज एका क्लिकवर मिळणार, किसान क्रेडिट कार्ड योजनेला सुरुवात. Kisan Credit Card Yojana.

WhatsApp Group Join Now

Kisan Credit Card Yojana. शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीला किंवा हंगामामध्ये शेतीसाठी उपयोगी पडावे याकरिता राज्य सरकार व केंद्र सरकार पीक कर्ज उपलब्ध करून देत असते. परंतु मागील काही काळापासून या पीक कर्जाचा लाभ घेणे शेतकऱ्यांसाठी खूपच डोकेदुखी झाली आहे.

पीक कर्ज मिळवण्यासाठी ची किचकट प्रक्रिया बँकेच्या बाहेर होत असलेले प्रचंड गर्दी यामुळे शेतकरी या कर्जाकडे पाठ फिरवतात. परंतु आता शेतकऱ्याला घरबसल्या त्याच्या मोबाईलवरून एका क्लिक करून आपल्या शेतीच्या क्षेत्रफळानुसार पीक कर्जाची रक्कम मिळणार आहे.

योजनेचा दोन जिल्ह्यांमध्ये प्रयोग संपन्न.

देशातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी बँक अकाउंट होणारा जाच आता कमी होणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक ॲप तयार केल्या असून या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शेती पिकाची नोंदणी व घरबसल्या शेती पिकांवर कर्ज मिळवू शकता. यासाठी देशातील बीड आणि फरीदाबाद जिल्ह्यांमध्ये येत्या मे 2024 पासून ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे.Kisan Credit Card Yojana.

📢 हे पण वाचा :- मोदी सरकारची मोठी घोषणा ; निवडणुकीच्या मुहूर्तावर गॅस झाले स्वस्त, पहा नवीन गॅसचे भाव..!

एका क्लिकवर असे मिळेल पीक कर्ज.

Kisan Credit Card Yojana. महाराष्ट्र राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून शेतकऱ्यांच्या पिकांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी एका ॲपची निर्मिती केली. व याच्याच धरतीवर केंद्र शासनाने येत्या खरीप हंगामापासून अशाच एका ॲपवर पिकाची नोंदणी आणि त्याच द्वारे शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचे नियोजन केले आहे.

बीड जिल्ह्यात पीक कर्ज योजनेचा प्रयोग.

देशभरामध्ये पी एम किसान सन्माननिधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधारशी संलग्न केले आहेत. तसेच सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीची सातत्याने पडताळणी करण्यात येत आहे. व जानेवारी 2024 पासून देशातील बीड आणि फरीदाबाद या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सातबाराला आधार कार्डला संलग्न करण्याची प्रक्रिया राबवली गेली होती. यामुळे जिल्ह्यातील 65 टक्के शेतकऱ्यांचे सातबारे आधारशी संलग्न झाले आहेत.

📢 हे पण वाचा :- या नंबर वर कॉल करा आणि मिळवा पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे मागील हफ्ते..!

कर्ज मिळवण्याची अशी असेल प्रक्रिया.

केंद्र सरकार देशभरामध्ये राबवणार असलेल्या मोहिमेअंतर्गत तुमचे आधार कार्ड तुमच्या सातबारेशी संलग्न झाल्यानंतर, शेतकऱ्याला त्याच्या मोबाईल मध्ये एक ॲप डाऊनलोड करायचे आहे.

व त्या ॲप मध्ये तुमचे नाव आणि आधार नंबर टाकल्यास ओटीपी द्वारे तुमची पडताळणी होईल.

व फेस आयडी च्या माध्यमातून शेतकऱ्याची खात्री पटवण्यात येईल. यानंतर शेतकऱ्याला हवे असलेल्या कर्जासाठी संबंधित बँकेची निवड करून घ्यावी.

यानंतर शेतकऱ्याला बँकेची संबंधित कर्जाची ऑफर दिसेल. यानंतर योग्य ती ऑफर निवडून एका सेकंदात तुमच्या बँक खात्यांमध्ये पीक कर्जाची रक्कम जमा होईल.

विशेष म्हणजे किसान क्रेडिट कार्ड मार्फत १ लाख ६० हजारापर्यंतच्या कर्जाला कोणतेही कारण नाहीये.Kisan Credit Card Yojana.

Leave a Comment