महिलांसाठी मोठी खुशखबर..! निवडणुकीच्या तोंडावर देशातील महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयांची कर्ज जाहीर. Lakhpati Didi Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Lakhpati Didi Yojana 2024 देशातील सर्वसामान्य महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार अनेक योजना राबवते. व अशाच प्रकारच्या एका योजनेची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिना दिवशी केली होती आणि ती योजना म्हणजे लखपती दीदी योजना.

त्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या अंतिम अर्थसंकल्पामध्ये देखील देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेचा उल्लेख केला होता. आता आज जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार योजनेअंतर्गत च्या महिलांची संख्या वाढवण्यात आली असून त्यांना देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्जाची रक्कम देखील वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

काय आहे लखपती दीदी योजना.

Lakhpati Didi Yojana 2024 लखपती दीदी योजनेअंतर्गत देशातील खेड्यापाड्यातील व सर्वसामान्य महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम केले जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी महिलांना बिनव्याजी कर्ज देण्याची उद्दिष्टे होते परंतु यामध्ये आता देशातील तीन कोटींपेक्षा अधिक महिलांना उद्योगासाठी आणि स्थानिक व्यवसायांसाठी पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! खरीप हंगामासाठी सरकार खतांचा साठा करणार व खतांच्या किंमती देखील जाहिर..!

कोणत्या उद्योगांसाठी मिळते महिलांना कर्ज.

केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत असते. व या कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत महिलांना एलईडी बल्प बनवणे, ड्रोन चालवणे, ड्रोन दुरुस्तीचे प्रशिक्षण देणे, इतर इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्तीचे प्रशिक्षण देणे तसेच प्लंबिंगचे प्रशिक्षण या महिलांना देण्यात येते व या सर्व घटकांकरिता देशातील गोरगरीब आणि सर्वसामान्य महिलांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

योजनेअंतर्गत महिलांना किती मिळते कर्ज.

15 ऑगस्ट 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लखपती दीदी योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळवण्याची सुविधा असून स्थानिक व गोरगरीब महिलांना या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचे कर्ज सध्या पुरवले जात आहे. तसेच आजपर्यंत या योजनेअंतर्गत देशातील 1 कोटी महिलांना कर्जाचा लाभ मिळाला आहे.

हे पण वाचा :- राशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी ; हे काम पूर्ण केले तरच मिळणार आता राशन, पहा नवीन नियम..!

योजनेअंतर्गत कोणत्या महिला आहेत पात्र.

लखपती किती योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जासाठी देशामधील 15 ते 50 या वयोगटातील सर्व महिला पात्र आहेत.
विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिला कोणत्याही बचत गटाची सदस्य असणे आवश्यक आहे.
याशिवाय संबंधित महिलेने याआधी अशा प्रकारच्या कोणत्याच योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ घेतलेला नसावा.
महिला कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकेचे थकबाकीदार नसावी.

योजनेसाठीचे आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेकडे आधार कार्ड पॅन कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक उत्पन्नाचा दाखला जातीचे प्रमाणपत्र मोबाईल नंबर व एक फोटो या सर्व कागदपत्रांसोबत इच्छुक महिलेला विभागीय बचत गट अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करायचा आहे व त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून अर्जाची पडताळणी करून पात्र महिलेस योजनेअंतर्गतच्या कर्जाची रक्कम दिली जाईल.Lakhpati Didi Yojana 2024

Leave a Comment