लेक लाडकी योजनेने कुटुंब होणार लखपती ; योजनेच्या अनुदान रक्कमेत वाढ. lek ladki yojana 2024.

WhatsApp Group Join Now

lek ladki yojana 2024 मुलीचा जन्मदर वाढवणे, मुली व स्त्रिया सक्षम करणे, मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन तथा आर्थिक मदत देणे यासाठी राज्य शासन वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या योजना राबवते. व याच योजनेअंतर्गत ची एक महत्वपूर्ण अशी योजना म्हणजे “लेक लाडकी योजना”.

तर मग काय आहे ही योजना आणि या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा व योजनेअंतर्गत कोणत्या मुलीला आणि आणि किती अनुदानित रक्कम मिळणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

जुन्या योजनेत बदल करून नवीन योजना जाहीर.

1 ऑगस्ट 2017 पासून महाराष्ट्र राज्य मध्ये मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, मुलींचे गर्भ हत्या रोखण्यासाठी व मुलीचा जन्मदर वाढून मुलींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य शासनामार्फत माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबवली जात होती. परंतु योजनेस मिळत असलेला अपुरा प्रतिसाद यामुळे या योजनेत सुधारित बदल करून राज्य शासनाने सन 2023-24 चा अर्थसंकल्पीय भाषणामध्ये “लेक लाडकी योजना ” जाहीर केली.lek ladki yojana 2024.

📢 हे पण वाचा :- राज्यात 100% अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन चे वाटप ; आजच अर्ज करा..!

योजनेअंतर्गत च्या अनुदान वितरणाची पद्धती.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देऊन मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर स्वतः मुलीला 75 हजार रुपये रोख रक्कम देण्यात येते.

लेक लाडकी योजना का राबवली जाते.

lek ladki yojana 2024. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देऊन राज्यात मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींची गर्भ हत्या कमी करून मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे व महत्त्वाचे म्हणजे शाळाबाहेरील मुलींना प्रोत्साहित करून दर 0% वर आणणे.

केव्हा-केव्हा मिळते योजनेचे अनुदान.

सदर योजनेअंतर्गत राज्यातील पिवळ्या व केशरी राशन कार्डधारक कुटुंबात जन्मास आलेल्या केवळ मुलींना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यास 5 हजार रुपये, मुलगी सहावीत केल्यास 7 हजार रुपये, अकरावीत गेल्यास 8 हजार रुपये तर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यास तिला रोख 75 हजार रुपये असे एकूण 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे.

📢 हे पण वाचा :- दुष्काळग्रस्त 40 तालुक्यात उर्वरित 75 टक्के विमा वाटप सुरू ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश..!

योजनेअंतर्गतच्या शर्ती व अटी.

सदर योजनेअंतर्गत केवळ पिवळ्या व केशरी राशन कार्डधारक कुटुंबातील मुलींच पात्र असतील.
अशा कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोनच मुलींना योजना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी जन्माला आल्यास केवळ मुलगी योजनेअंतर्गत पात्र राहील.
संबंधित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असायला हवे व उत्पन्नाचे प्रमाणपत्र देखील असायला हवे.lek ladki yojana 2024.

योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे.

लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला, कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, लाभार्थी मुलीचे आधार कार्ड ( पहिल्या हप्त्याच्या लाभा वेळेस ही अट शिथिल राहील. )
पालकाचे आधार कार्ड, बँक पासबुक च्या पहिल्या पानाची प्रत, कुटुंब प्रमुखाचे राशन कार्ड, कुटुंबप्रमुखाचे मतदान कार्ड.

 

Leave a Comment