शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! मागेल त्याला सोलार योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी ; आता लगेच अर्ज लगेच मंजुरी. Magel Tyala Solar Yojana.

WhatsApp Group Join Now

Magel Tyala Solar Yojana. महाराष्ट्र राज्य सरकारचे 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करते वेळेस राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मागेल त्याला सोलर या योजनेची घोषणा करण्यात आली. आणि या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना लगेच अर्ज व लगेच मंजुरी या तत्त्वावर प्रत्येक वर्षी एक लाखापेक्षा अधिक सोलर कृषी पंप वितरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. आणि यासाठीच कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देऊन योजनेस सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्र्याकडून मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा.

पारेषण विरहित कृषी पंप विस्थापनासाठी अपारंपारिक वीज देण्यासाठी सौर ऊर्जा अंतर्गत नवीन योजना राबवून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे वीज देण्याकरिता एआयआयबी बँकेकडून कर्ज घेण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते.

📢हे पण वाचा :- खुशखबर..! तुम्हाला मिळणार ६ महिने मोफत एसटीने प्रवास ; आजच करून घ्या हे काम..!

योजनेच्या अंमलबजावणीला परवानगी.

Magel Tyala Solar Yojana. राज्य शासनाच्या मागील त्याला सोलार या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी एक लाख याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये पाच लाख पारेषण विरहित सौर कृषी पंपाचे वितरण महावितरण द्वारे करण्यात येणार आहे आणि योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 12 हजार 493.56 कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्यासाठी 1 हजार 545.25 कोटी रुपये असे एकूण 15 हजार 39 कोटी इतक्या खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

राज्य शासनाकडून योजनेसाठी निधीची तरतूद.

राज्य शासनाच्या मागील त्याला सोलर या योजनेसाठी लागणाऱ्या खर्चाची 60% रक्कम 9 हजार 20 कोटी एवढा निधी एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक ( AIIB ) यांच्याकडून कर्ज स्वरूपामध्ये घेऊन महावितरण कंपनीस योजनेच्या अंमलबजावणीसाठी देण्यात येणार आहे. व 2024 ते 2028 या वर्षाकरिता उर्वरित निधी 4 हजार 817.97 कोटी रुपये राज्य शासनाकडून वितरित करण्यात येईल.

📢हे पण वाचा :- राज्यात खरोखरच पुढील चार दिवसांमध्ये पाऊस पडणार का? कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता व काय आहे हवामान अंदाज..!

योजनेच्या सक्षमीकरणासाठी देखील निधीची तरतूद.

महावितरण द्वारे राज्यामध्ये पुरवल्या जाणाऱ्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी म्हणजे 15 वर्षांपूर्वीचे वीज रोहित्रे बदलण्यासाठी व त्यांची ऑइल बदली करण्यासाठी 11 हजार 585 कोटी रुपये एवढा खर्च येणार असून यांपैकी 8 हजार 109 कोटी रुपये खर्च प्रचलित व्याजदराने एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून ( ADB ) कर्ज स्वरूपामध्ये घेण्यात येणार आहे.Magel Tyala Solar Yojana.

Leave a Comment