Maharashtra Avkali Paus News राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ ; पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा.

WhatsApp Group Join Now

Maharashtra Avkali Paus News राज्यात या महिन्यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांसह मराठवाडा व राज्यातील उर्वरित भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ मातला आहे. यामध्ये विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, वाशिम व हिंगोली तसेच मराठवाड्यातील संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये काल अतिवृष्टीने धुमाकूळ मातवला. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाली आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस राज्यांमध्ये उर्वरित काही जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

काल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ.

संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काल सलग तिसऱ्या दिवशी चक्रीवादळासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे, शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा व मका ही पिके भोई सपाट झाली असून शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

हे पण वाचा :- मार्च महिन्यापासून मिळणार मोफत वीज, लाईट बिल नाही ; मीटर काढली जाणार..!

जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.

जालना जिल्ह्यामध्ये देखील अक्षरशः मागील तीन दिवसापासून सलग अतिवृष्टी व गारपीट होत आहे. यासोबत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या मालमत्तेचे आतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिके तर हातातून गेलीच आहेत परंतु सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडून जाणे व घराच्या भिंती पडणे अशा घटना देखील घडले आहेत. यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून राज्य शासनाकडे तात्काळ नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.Maharashtra Avkali Paus News.

विदर्भात आणखीन दोन दिवस पावसाची शक्यता.

Maharashtra Avkali Paus News विदर्भात राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असल्यामुळे, पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतेक जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी आणि गारपीट होत आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवस विदर्भात काही ठिकाणी साधारण अवकाळी पाऊस होईल तर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हे पण वाचा :- वाळु धोरणात बदल ; आता 600 रुपये ब्रास नाही तर 2000 रुपये ब्रासने मिळणार वाळु..!

आणखीन किती दिवस राहणार अवकाळी पाऊस.

देशात पूर्व मध्य अरबी समुद्रापासून ते राजस्थान पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे व दक्षिण कर्नाटक पासून ते मध्य महाराष्ट्र पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार होत असून विदर्भ आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस व गारपिट होत आहे व पुढील दोन दिवस असेच वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment