राज्यात पुन्हा या जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज, पहा आजचा सविस्तर हवामान अंदाज. Maharashtra Avkali Paus.

WhatsApp Group Join Now

Maharashtra Avkali Paus.राज्यातील शेतकऱ्यांचे यावर्षीचे खरीप हंगाम तर अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपीट व हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे उध्वस्त झाले. त्यानंतर शेतकऱ्यांना यावर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांकडून थोडीशी आशा असताना, रब्बी हंगामामध्ये देखील अवकाळी पाऊस व गारपिटीने हजेरी लावली आहे.

राज्यातील विदर्भ मराठवाडा व इतर काही तुरळक जिल्ह्यांमध्ये मागील काही महिन्यांमध्ये देखील अवकाळी पाऊस व गारपीट झाली व पुढील दोन दिवसांमध्ये आणखीन राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट होण्याचाअंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात काही जिल्ह्यात गारपीटीची शक्यता.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने शनिवारी जाहीर केलेल्या हवामान अंदाजानुसार विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट होण्याची शक्यता वर्तवली आह. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपली रब्बीची कामे लवकर आटोपण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Maharashtra Avkali Paus.

हे पण वाचा :- कापूस उत्पादकांसाठी खुशखबर..! कापसाला मिळतोय 8000 रुपयांच्या वर भाव, पहा आजचे कापुस बाजार भाव..!

विदर्भातील या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा.

पुढील चार दिवसांमध्ये विदर्भातील हिंगोली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 प्रति किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तन आहे त्यामुळे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उद्या या जिल्ह्यात होणार अवकाळी पाऊस.

उद्या पुन्हा एकदा विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस व गारपीट होण्याचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे. विशेषतः यवतमाळ, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे.

हे पण वाचा :- महिलांसाठी मोठी खुशखबर..! निवडणुकीच्या तोंडावर देशातील महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयांची कर्ज जाहीर.

मराठवाड्यातील हवामानाचा अंदाज.

मागील काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये उन्हाचा चांगला चटका पडला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सायंकाळच्या वेळेस थोडेसे थंड वारे वाहत असुन रात्री गोड अशी थंडी कायम आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील फक्त हिंगोली आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.Maharashtra Avkali Paus.

राज्यातील एप्रिल महिन्यातील हवामान स्थिती.

राज्यात सर्वत्र उन्हाळ्याची सुरुवात होत असून, राज्यातील जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यात हवामान कोरडे राहणार असून, तुरळक जिल्ह्यामध्ये सायंकाळी थोडीशी थंडी राहील व दिवसभर वातावरणात गरमाई कायम राहील.

Leave a Comment