Maharashtra Budget 2024 अर्थसंकल्पीय अधिवेशन घोषणा ; अवकाळी पाऊस अनुदानासह दूध अनुदानासाठी निधीची तरतूद.

WhatsApp Group Join Now

Maharashtra Budget 2024 काल महाराष्ट्र राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. व या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 8609 कोटी 10 लाख रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या. यापूर्वी मागणीमध्ये अवकाळी व अतिवृष्टी पावसाच्या अंतरासाठी व राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान देण्यासाठी देखील निधीची मागणी करणाऱ्या पुरवल्या सादर करण्यात आल्या.

पहिल्या दिवशीच्या पुरवणी मागणीतील तरतुदी.

Maharashtra Budget 2024 अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यात नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस गारपीट व वादळी वारे यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या व फळ पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाई साठी 2210 कोटी रुपये व दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यासाठी 204 कोटी 76 लाख 34 हजार कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली.

अवकाळी पाऊस नुकसान भरपाईसाठी अनुदान.

आज सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागणीमध्ये राज्यात माहे नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात अवकाळी पाऊस, चक्रीवादळे, गारपीट व वादळी वारे यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या, फळ पिकांच्या व इतर मालमत्तांच्या नुकसान भरपाईसाठी 2210 कोटी 30 लाख रुपयांची रक्कमेची पुरवणी मागणी सादर करण्यात आली.Maharashtra Budget 2024

दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची पुरवणी मागणी सादर.

राज्यात दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे, यामुळेच दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दुधाला अनुदान देण्याची मागणी करण्यात येत होती. व याच पार्श्वभूमीवर मागील नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. व या मागणीसाठी अतिरिक्त 248 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

महावितरणच्या ग्राहकांना शासनाकडून अनुदान.

महाराष्ट्र राज्यामधील कृषी पंप, यंत्रमाग व वस्त्र उद्योग ग्राहकांना शासनाकडून अनुदान वितरण करण्यासाठी 2031 कोटी 15 लाख रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे. व या रकमेपैकी 1377 कोटी रुपये रक्कम समायोजित रक्कम आहे.Maharashtra Budget 2024.

आज सादर करण्यात आलेल्या इतर पुरवणी मागण्या.

आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्ज मंत्री अजित पवार यांच्याकडून इतर विभागासाठी देखील निधीची मागणी करणाऱ्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. यामध्ये अवकाळी पाऊस नुकसान भरपाई भरपाई करिता १६६१.४९ कोटी रुपये तर नागरी पायाभूत सुविधा अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 569 कोटी रुपये तसेच मुंबई पुणे मेट्रो कर्ज थकबाकी परतफेड करण्यासाठी 1438.78 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली.

Leave a Comment