MAHARASHTRA DROUGHT 2023 दुष्काळसदृश्य जिल्ह्यातील मंडळांच्या याद्या आल्या ; मिळणार या अतिरिक्त सवलती

WhatsApp Group Join Now

MAHARASHTRA DROUGHT 2023 शेतकऱ्यांना अतिवृष्टी, चक्रीवादळ अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. त्यावर पिकांवर पडणारा कीड रोग व व उर्वरित दुष्काळ शेतकऱ्यांना गाठतोच. अशातच मागील काळात राज्यात 21 दिवसापेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळ सदस्य परिस्थिती जाहीर करून राज्यातील जिल्ह्यांमधील मंडळांचा या अंतर्गत समावेश करण्यात आला होता.

आता या मंडळाच्या याद्यांमध्ये काही अतिरिक्त मंडळांचा समावेश करण्यात आला आहे व यांच्या सुधारित याद्या राज्य सरकारने जाहीर केले आहेत. आणि या सर्व मंडळांना राज्य शासनाद्वारे काही अतिरिक्त सवलती देण्यात येणार आहेत तर मग ही नवीन कोणती मंडळ आहेत आणि यांना कोणत्या अतिरिक्त सवलती मिळतील चला तर मग सविस्तर रित्या जाणून घेऊया.

दुष्काळसदृश्य मंडळांत वाढ.

MAHARASHTRA DROUGHT 2023 सुरुवातीच्या टप्प्यामध्ये राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये मंडळांचा समावेश करते वेळेस खरीप हंगामात जिल्ह्यातील 52 महसूल मंडळापैकी केवळ 39 महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे उर्वरित तेरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त सवलती.

आता या दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने सुधारित याद्यांमध्ये या उर्वरित 13 महसूल मंडळांचा देखील समावेश करून दुष्काळ सदस्य परिस्थिती जाहीर केली आहे. वयामंडळांसोबत उर्वरित सर्वच जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदस्य परिस्थिती जाहीर करून अतिरिक्त सवलती देखील लागू करण्यात येणार आहेत.MAHARASHTRA DROUGHT 2023.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी व प्लास्टिक अस्तीकरण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर..!

या मंडळांचा नव्याने समावेश.

परभणी जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील पिके तर हातातून गेलीस परंतु सध्यस्थितीला तलावातील पाणीसाठा तळाला गेल्यामुळे रब्बी हंगामातील एकही पीक हाती लागले नाही व आता पिण्याच्या पाण्याचा व जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या अतिरिक्त सवलती मिळणार.

परभणी जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती अंतर्गत पात्र ठरलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमीन महसूलीमध्ये सूट मिळणार आहे, सरकारी कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल, शेतीशी निगडीत असलेल्या कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात येईल व चालू कृषी पंपाच्या वीज बिलात ते 33 टक्के सूट देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.MAHARASHTRA DROUGHT 2023.

हे पण वाचा :- वाळुसाठी ऑनलाइन अर्ज चालु ; या लोकांना मिळणार मोफत वाळू..!

शेतकऱ्यांसाठी इतर अतिरिक्त सवलती.

दुष्काळसदृश भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात येईल, व विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क देखील माफ करण्यात येईल, रोहयो अंतर्गत कामाच्य निकषामध्ये काही प्रमाणात काही प्रमाणात सवलत देण्यात येईल आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.MAHARASHTRA DROUGHT 2023.

Leave a Comment