खुशखबर..! तुम्हाला मिळणार ६ महिने मोफत एसटीने प्रवास ; आजच करून घ्या हे काम. Maharashtra Free Travel Scheme

WhatsApp Group Join Now

Maharashtra Free Travel Scheme महाराष्ट्र राज्यामध्ये रेल्वेच्या नंतर सर्वाधिक प्रवास हा बस ने केला जातो व त्यामध्ये पण राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या एसटी बसने महाराष्ट्र राज्यात प्रवास करणे प्रवाशांना अधिक सोयीस्कर वाटते. त्यामुळेच एसटी महामंडळ व राज्य शासनाअंतर्गत प्रवाशांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यांच्या अंतर्गत नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना मोफत प्रवास व विद्यार्थ्यांना पैशाच्या सवलतीप्रमाणे प्रवास करता येतो.

परिवहन महामंडळाच्या विविध योजना.

राष्ट्रीय परिवहन महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र राज्य मध्ये 65 वयोगटाच्या वरील वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ व्यक्तींसाठी तिकिटांमध्ये 50% सवलतीवर या नागरिकांना प्रवास करता येतो. व नुकत्याच काही महिन्यांपूर्वी राज्यशासनाने जाहीर केल्याप्रमाणे आता राज्यातील महिलांना देखील मोफत प्रवास करता येणार आहे. त्यांना प्रवाशासाठी एक रुपयाही मोजण्याची गरज नाही.

📢हे पण वाचा :- राज्यात खरोखरच पुढील चार दिवसांमध्ये पाऊस पडणार का? कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता व काय आहे हवामान अंदाज..!

फक्त या नागरिकांना मिळणार मोफत प्रवास.

Maharashtra Free Travel Scheme नुकत्याच काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाच्या जाहीर करण्यात आलेल्या सुधारित परिपत्रकानुसार महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या निवृत्त झालेल्या व ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना व वैद्यकीय कारणामुळे निवृत्ती घेतलेल्या महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना वयाच्या 75 दहा वर्षापर्यंत सलग सहा महिने एसटी बसने मोफत प्रवास करता येणार आहे.

या महिलांना देखील मिळणार मोफत प्रवास.

महाराष्ट्र परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या किंवा वैद्यकीय कारणांमुळे सेवानिवृत्त झालेल्या महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पत्नीस देखील वयाच्या 65 वर्षापर्यंत सलग सहा महिने राज्य शासनाच्या बसने मोफत प्रवास करता येणार आहे.

📢हे पण वाचा :- अग्रीम पिकविमा टप्पा दोनच्या वितरणाला सुरुवात, या शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम जमा झाल्याचे मेसेज आले..!

काय असेल मोफत प्रवासाचा कार्यकाल.

राज्य शासनाच्या या योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत म्हणजे ऑफ सीजन कालावधीमध्ये प्रवास करता येणार आहे. व या प्रवासासाठी पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून पास देण्यात येतील व त्या अंतर्गत प्रवास करता येईल.

या पासद्वारे कोठे कोठे प्रवास करता येईल.

राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पासवर लाभार्थ्याला महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस जिथपर्यंत जातात तिथपर्यंत प्रवास करता येईल. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रवास करता येईल तसेच महाराष्ट्र लगत च्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र परिवार महामंडळाचे बस जाते त्या ठिकाणी देखील तुम्हाला या पासद्वारे प्रवास करता येईल.Maharashtra Free Travel Scheme.

Leave a Comment