Maharashtra longest highway राज्यातील 802 किलोमीटर लांबीच्या पहिल्या महामार्गाला मंजुरी ; डिसेंबर अखेरपर्यंत होणार काम पूर्ण.

WhatsApp Group Join Now

Maharashtra longest highway महाराष्ट्र राज्य मधील आतापर्यंत सर्वात लांब असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले असून या समृद्धी महामार्गापेक्षाही अंतराने लाभ असणारा शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मेगा प्रोजेक्टला सरकारने मंजुरी दिली आहे. आणि हा राज्यातील सर्वात जास्त लांब असलेला महामार्ग येत्या डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. तर मग हा महामार्ग राज्यातील कोणकोणत्या शहराला जोडणार आहे, व त्याची लांबी किती असेल आजच्या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया.

राज्यातील सर्वात लांब महामार्गाला मंजुरी.

महाराष्ट्र राज्य मध्ये आज पर्यंत 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग आहे. जो महामार्ग नागपूरहून मुंबईला जोडतो. हा महामार्ग देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. नंतर शिंदे-फडणीस-पवार सरकारने राज्यातील आजपर्यंतचा सर्वात लांब महामार्ग म्हणजे शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केली आहे जो की 802 किलोमीटर लांबीचा असेल.Maharashtra longest highway.

हे पण वाचा :- शेतकरी अपघात विमा वाटपाला गति ; ८८९४ विम्याचे दावे मंजुर..!

नागपुर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचे वैशिष्ट्य.

शिंदे-पवार-फडणवीस सरकारने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या आखणीला मान्यता दिली असून, 802 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाने राज्यातील 12 जिल्ह्यातील एकूण 19 देवस्थाने जोडली जाणार आहेत. अवघ्या काही दिवसात या महामार्गाचा सविस्तर अहवाल अंतिम केला जाणारा असून डिसेंबर 2024 पर्यंत हा महामार्ग पूर्णपणे तयार केला जाणार आहे.

शक्तीपीठ महामार्ग या शहरांना जोडणार.

Maharashtra longest highway मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर तयार करण्यात येत असलेल्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची उभारणी करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील पावनेर येथून हा महामार्ग सुरू होत असून गोवा राज्याच्या सीमेवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रा देवी या ठिकाणाला जोडणार आहे. व साधारणतः 86 हजार 300 कोटी रुपये एवढा निधी या महामार्गाला लागण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :- या जिल्ह्यांतील सव्वा लाख शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई जाहीर- कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा..!

शक्तीपीठ महामार्ग या जिल्ह्यांना जोडणार.

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. जो की वर्धा जिल्ह्यातील पावनेर येथून सुरू होऊन यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या शक्तीपीठाच्या स्थळी समाप्त होईल. 802 किलोमीटर लांबीच्या या राज्यातील सर्वात मोठ्या महामार्गावर 26 ठिकाणी एंटरचेंज असणार आहेत.Maharashtra longest highway.

शक्तीपीठ महामार्गाने ही देवस्थाने जोडली जाणार. 

शक्तीपीठ महामार्गाची सुरुवात वर्धा जिल्ह्यात केळझर चा गणपती, कळंब मधील गणपती मंदिर व सेवाग्राम देवस्थान यांना जोडेन.
वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी देवस्थान,
नांदेड जिल्ह्यात माहूरगड शक्तीपीठ व सचखंड गुरुद्वारा,
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ,
बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग व अंबाजोगाईमधील अंबादेवी शक्तिपीठ,
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूरची तुळजाभवानी,
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरचे विठ्ठल मंदिर व अक्कलकोट देवस्थान,
सांगली जिल्ह्यात औदुंबरचे दत्त मंदिर,
कोल्हापूर जिल्ह्यात नरसोबाची वाडी, ज्योतिबा देवस्थान, अंबाबाईचे मंदिर व संत बाळूमामा समाधी स्थळ आदमापूर,
शेवटी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर देवस्थानाहून पत्रादेवी शक्तीपीठ या राज्यातील देवस्थानांना हा महामार्ग जोडेल.

Leave a Comment