शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी..! म. ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेतुन लाखो शेतकरी वगळले. Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana.

WhatsApp Group Join Now

Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana. राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आपल्या पीक कर्जाचे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमुक्तीची घोषणा केली. व या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी काही जाचक अटी लावल्या व याच अटींमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आले असल्याच्या अपडेट समोर येत आहेत.

या शेतकऱ्यांवर होत आहे अन्याय.

महाराष्ट्र राज्य शासनाकडून आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा केली. राज्य शासनाकडून मात्र एका वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या परंतु तीन वर्षांमध्ये केवळ एकदाच पीक कर्ज उचललेल्या 36 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळल्यामुळे या योजनेअंतर्गत अन्याय होत आहे.Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! अवकाळी पाऊस नुकसान भरपाई चे पुन्हा एकदा पैसे आले, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची घोषणा..!

या शेतकऱ्यांना कर्जमाफी अंतर्गत इतकी रक्कम मिळाली.

Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana. आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान लाभ देण्यासाठी 2017/18, 2018/19, 2019/20 हा कालावधी राज्य शासनाने विचारात घेतला. व या शेतकऱ्यांना कर्जाच्या मोबदल्यावर जास्तीत जास्त 50 हजार रुपये प्रोत्साहन पर लाभ दिला. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील कर्जमाफी अंतर्गत पात्र असणाऱ्या 1 लाख 77 हजार 359 शेतकऱ्यांसाठी 644 कोटी 69 लाख रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील इतक्या लाभार्थ्यांना कर्जमाफीतून वगळले.

सहकार उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2017 ते 2020 या तीन वर्षाच्या काळामध्ये केवळ एकदाच पीक कर्ज घेऊन त्याची नियमितपणे परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची यादी यापूर्वीच एक वेळेस अपडेट केली होती. आणि या वेळेसच या यादीतून कोल्हापूर जिल्ह्यातील 35 % कर्जमाफी अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वगळण्यात आले, यामुळे जिल्ह्यातील सुमारे 36 हजार शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! राज्य सरकारची आणखिन २ लाख सौर कृषि पंपाची घोषणा.पहा संपूर्ण बातमी..!

शेतकऱ्यांकडून सरकार विरुद्ध नाराजी व्यक्त.

कोल्हापूर जिल्ह्यामधील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अपात्र करून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांकडून सरकारविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आम्हाला या कर्जमाफी अंतर्गत पात्र ठरवून देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ द्यावा, अन्यथा सरकार विरुद्ध आंदोलन करण्याची घोषणा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment