MARATHA RESERVATION मराठा आंदोलक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 71 लाख 55 हजार रुपयांची आर्थिक मदत.

WhatsApp Group Join Now

MARATHA RESERVATION राज्यात मागील काही महिन्यापासून मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे व मराठा आंदोलनाचे प्रमुख आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी हे गाव मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले. या गावातील शेतकऱ्यांनी देखील या आंदोलनाला हवा तसा पाठिंबा दिला. व या गावात प्रथम म्हणून जागे पाटील यांची सभा झाली त्यावेळेस प्रचंड गर्दी जमल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते आणि याच नुकसानीसाठी राज्य सरकारने 32 लाख रुपयांचे आर्थिक मदत जाहीर केली आहे.

या आंदोलन शेतकऱ्यांना मिळणार मदत.

14 ऑक्टोबर 2023 रोजी अंबड तालुक्यातील मनोज डांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी या गावांमध्ये जरांगे पाटील यांच्या सभी वेळी राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा बांधव अंतरवली सराटी येथे जमा झाली होते. वया लाखोच्या गर्दीला बसण्याची त्यांच्या गाड्या पार्क करण्याची सोय तेथील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती पिकाचे बलिदान देऊन केली होती. त्यामुळेच या शेतकऱ्यांच्या झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी अंतरवाली सराटी गावातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

हे पण वाचा :- प्रत्येकाचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ; आता मागेल त्याला घरकुल, नवीन याद्या आल्या..!

मुख्यमंत्र्यांकडून 14 लाख रुपये नीधी मंजूर.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांच्या सभेमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झाले त्या 441 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 32 लाख रुपयांचे नुकसान भरपाई खात्यात जमा करण्यात आली आहे व आता दुसऱ्या टप्प्यासाठी उर्वरित 130 शेतकरी बांधवांसाठी 14 लाख 55 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

आंदोलनावेळी जखमी झालेल्यांना देखील मदत.

अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलनावर ज्यावेळेस पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आला तेव्हा या लाठी चार्ज मध्ये जखमी झालेल्या आंदोलकांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मधून 25 लाख रुपये पेक्षा अधिक निधीचे वाटप करण्यात आले आहे. व आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला देखील शासनाकडून अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

हे पण वाचा :-ऊसतोड कामगारांना मोठा दिलासा ; अपघात विम्यास पाच लाख रुपये अनुदान..!

आंदोलकांसाठी एकूण 71 लाख 55 हजार अर्थसहाय्य.

राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनामुळे शेतकऱ्याचे व स्वतः आंदोलकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनामार्फत आत्तापर्यंत 71 लाख 55 हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात आले आहे. यामध्ये 46 लाख 55 हजार रुपये अर्थसहाय्य हे अंतरवाली सराटी येथे सभेवेळी शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तर उर्वरित 25 लाख रुपये हे जखमी आंदोलकांच्या उपचारासाठी व आंदोलनावेळी आत्महत्या केलेल्या आंदोलकांच्या कुटुंबाला अर्थसहाय्य म्हणून वितरित केले आहेत.

Leave a Comment