Maratha reservation :- भुजबळांकडून ओबीसींच्या स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा.

WhatsApp Group Join Now

Maratha reservation :- राज्यात मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न खूप दिवसापासून रखडत होता जो की शिंदे फडणवीस पवार सरकारने काही प्रमाणात सोडवला आहे. राज्यातील सर्व मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाजाच्या सवलती देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर याला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध दर्शविला व या निर्णयाच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर छगन भुजबळ मोर्चे आणि सभा सध्या घेत आहेत. व आता त्यांनी थेट सरकारलाच विरोध करीत ओबीसी बांधवांसाठी स्वतंत्र राजकीय पक्ष काढणार असल्याची घोषणा केली आहे.

राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी वाद शिगेला :- (Maratha reservation)

राज्यात मागील काही महिन्यांपासून मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज वाद शिगेला पोहोचला आहे . राज्य सरकारने मराठा बांधवांच्या खूप काळापासून रखडत असलेल्या मराठा आरक्षण या मुद्द्याला न्याय देऊन मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा अध्यादेश जाहीर केला व त्यानंतर राज्यात अधिकच मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण तयार झाले आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर सरकारला सलो का पळ करून सोडले होते. सरकार यावर कोणताच निर्णय घेत नसल्यामुळे मनोज सारंगे पाटील यांच्या समवेत लाखो मराठा समाज बांधव मुंबई येथे उपोषण करण्यासाठी गोळा होत होते, परंतु सरकारने यांना मुंबईच्या बाहेरच वाशीमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभास्थळी जाऊन जरांगे पाटलांना आरक्षणाचा अध्यादेश हस्तांतरित केला.

हे ही वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2109 कोटी निधी वितरणास मंजुरी.

भुजबळांच्या राज्यभर सभा :- (Maratha reservation)

मराठा समाजातील बांधवाना सरसकट ओबीसी प्रवर्गामध्ये म्हणजेच सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असा अध्यादेश मराठा समाजाला सुपूर्त केल्यानंतर,ओबीसी समाजाने यास विरोध दर्शविला व ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मोर्चे आणि सभा घेण्यास सुरुवात केली.

4 फेब्रुवारी 2024 रोजी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर व इतर ओबीसी नेत्यांसोबत अहमदनगर येथे लाखोच्या संख्येने ओबीसी समाजाची विराट सभा झाली व याच सभेमध्ये छगन भुजबळ यांनी आपण स्वातंत्र्य पक्ष निर्माण करत असल्याचे संकेत दिले होते.

हे ही वाचा :- पि एम किसान व नमो शेतकरी योजनांचे हाप्ते फेब्रुवारी महिन्यातच जमा होणार.

अवघ्या दोन दिवसात पक्ष्याच्या नावाची घोषणा :- (Maratha reservation)

या सभेनंतर ओबीसी महामोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी एक पत्रकार परिषद घेतली व त्या पत्रकार परिषदेमध्ये याबद्दलचा सविस्तर खुलासा केला की अवघ्या काही दिवसांमध्ये छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व ओबीसी नेते एकत्र येऊन स्वतंत्र ओबीसी पक्षाची निर्मिती करणार असल्याचे जाहीर केले आहे.

तसेच पुढील अवघ्या दोन दिवसांमध्ये पक्षाचे नाव आणि पक्षाचे धोरण जाहीर देखील जाहीर करणार असल्याचे ओबीसी महामोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे त्यांनी सांगितले तसेच यासाठी 15 सदस्यांची स्टेरिंग कमिटी तयार करण्यात आली असून पुढील दोन दिवसांमध्ये पक्षाच्या नावाची आणि इतर गोष्टींची घोषणा करणार असल्याचे त्यावेळेस म्हणाले.

Leave a Comment