दूध उत्पादकांसाठी मोठी बातमी..! पाच रुपये दूध अनुदान फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार, मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा. Milk Subsidy Maharashtra.

WhatsApp Group Join Now

Milk Subsidy Maharashtra.यावर्षी चहु बाजूनेच शेतकऱ्यांची हाल अपेष्टा सुरू आहे. कारण की यावर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळामुळे व त्यानंतर अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची खरिपाचे पिके हातून गेली. त्यानंतर रब्बी हंगामात देखील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे उत्पन्न घटले व शेतीमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे शेतकरी त्रस्त होते.

 तर दुसरीकडे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत असलेल्या शेतकऱ्यांच्या दुधाला देखील योग्य भाव मिळत नाही. यामुळेच राज्य शासनाने राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले होते. आता या अनुदानासाठी राज्य शासनाने काही शर्ती व अटी लागू केल्या आहेत.

यापूर्वीची दूध अनुदानासाठीची पात्रता.

महाराष्ट्र राज्यामध्ये दुधाचे दर घसरल्यामुळे राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. व या अनुदानासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला किमान २७ रुपये प्रति लिटर भाव मिळाला असणे बंधनकारक होते.
मात्र बहुतेक शेतकऱ्यांच्या दुधाला 27 रुपये प्रति लिटर भाव मिळाला नसल्यामुळे व या जाचक अटी मध्ये शेतकरी बसत नसल्यामुळे या शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे दूध उत्पादकांना सरसकट अनुदान मिळण्यासाठी राज्य शासनाने या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण असे बदल केले आहे.
हे पण वाचा :- कापूस उत्पादकांसाठी खुशखबर..! कापसाला मिळतोय 8000 रुपयांच्या वर भाव, पहा आजचे कापुस बाजार भाव..!

काय आहे सध्याची दूध अनुदानासाठीची पात्रता.

दिनांक 15 मार्च 2024 रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागा सोबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठक घेतली असता असा अध्यादेश काढला आहे की आता राज्यातील 27 रुपये प्रति मीटर ऐवजी 25 रुपये प्रति लिटर दुधाला भाव मिळालेल्या शेतकऱ्यांना या दूध अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे.Milk Subsidy Maharashtra.
तसेच 3.5 फॅट 8.5 एसएनएफ गुणप्रत असलेल्या दुधाला 27 रुपये प्रति लिटर ऐवजी 25 रुपये प्रति लिटर भाव मिळाला असला तरी देखील या शेतकऱ्यांना प्रति लिटर अतिरिक्त 5 रुपये अनुदान बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

असे होणार दुध अनुदानाचे वितरण.

सात ते आठ महिन्यापूर्वी 39 ते 40 रुपये प्रति लिटर दराने विक्री होणारे दूध मागील तीन ते चार महिन्यांपासून 25 ते 28 रुपये प्रति लिटर दराने विक्री होऊ लागले. त्यामुळे राज्य शासनाने दूध दर नियंत्रण समिती जाहीर केली व दुधाचे भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु  या समितीला दुधाचे दर नियंत्रणात आणणे शक्य न झाल्यामुळे मराठी शासनाने दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले.Milk Subsidy Maharashtra.
यानुसार राज्यातील 27 रुपये प्रति लिटर दराने विक्री झालेल्या दुधाला अतिरिक्त पाच रुपये अनुदान मिळणार होते परंतु आता 25 रुपये प्रति लिटर दराने विक्री झालेल्या अतिरिक्त पाच रुपयांचे अनुदान राज्य सरकार थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करणार आहे.

Leave a Comment