दुधाच्या प्रति लिटर 5 रुपये अनुदानासाठी असा दाखल करा प्रस्ताव, तरच मिळेल अनुदान. Milk Subsidy

WhatsApp Group Join Now

Milk Subsidy राज्यात मागील काही महिन्यांपासून दुधाचे दर दबावात आहेत. व दुधाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत आणि शेतकऱ्यांकडुन दुधाला अनुदान देण्यात यावे अशी सतत मागणी केली जात होती. त्यामुळे मागील अधिवेशनात राज्य सरकारने दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. तर मग या अनुदानासाठी अनुदान मागणीचा प्रस्ताव करा दाखल करायचा या बद्दल सविस्तर माहिती आज आपण या लेखात जाणून घेऊया.

दूध अनुदान वितरणाची मुदत वाढवली.

Milk Subsidy.राज्यात दुधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या महिनाभराच्या कालावधीत गाईंच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले होते. परंतु आता मुदत 10 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

📢हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत गोठ्यासाठी आता शंभर टक्के अनुदान आजच करा अर्ज

दूध अनुदानासाठी प्रस्तावांची मागणी.

दुधाला राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रतिलिटर पाच रुपये या अनुदानासाठी राज्य सरकारने ऑनलाईन पद्धतीने प्रस्तावांची मागणी केली आहे. ज्या अंतर्गत राज्य शासन राज्यातील उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानाच्या वितरण करणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ व जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सरकारने केली आहे.Milk Subsidy.

दुध अनुदानासाठी असा दाखल करा प्रस्ताव.

दूध अनुदानासाठी राज्य सरकारने प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केले आहे. व या प्रस्तावासाठी 24 कॉलमचा एक फॉरमॅट तयार करण्यात आला आहे. व त्यात संबंधित दूध उत्पादकाची संपूर्ण माहिती भरायचे आहे जी की स्वतः दूध उत्पादक शेतकऱ्याला भरणे खूप किचकट आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हा फॉर्म भरण्यासाठी तालुकास्तरावरील कृषी अधिकारी किंवा सीएससी सेंटरला भेट द्यावी लागणार आहे.

📢हे पण वाचा :- खुशखबर..! मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ व लाभ घेण्याचे आवाहन..!
 

किचकट प्रक्रियेमुळे शेतकरी संतप्त.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रस्ताव दाखल करण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. अनुदानासाठी गाईला टॅगिंग करणे आवश्यक आहे. व गाईचे टॅगिंग आधार कार्डशी लिंक केल्यानंतरच संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम वितरित केली जात आहे. त्यामुळे गाईचे टॅगिंग करणे हेच मोठी अडचण बनली आहे.Milk Subsidy.

Leave a Comment