मिनी ट्रॅक्टर योजनेच्या अनुदानात वाढ ; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन-अजित पवार. Mini Tractor Yojana

WhatsApp Group Join Now

Mini Tractor Yojana राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या साधनांच्या पुरवठ्यासाठी राज्य शासन व केंद्र शासन वेगवेगळ्या योजना राबवते. ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन व विद्युत पंप देण्यात येतात. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी मिनी ट्रॅक्टर वितरणासाठी समाज कल्याण विभागामार्फत पाठपुरावा केला जात आहे व या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

योजनेतील लाभार्थ्यांची संख्या घटली.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत चालवल्या चालणाऱ्या मिनी ट्रॅक्टर योजनेच्या अनुदानात गेल्या १२ वर्षात सतत वाढ करण्यात येत आहे. परिणामी केवळ राज्यातील 237 बचत गटातील लाभार्थ्यांनी योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टरचा लाभ घेतल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्यामुळे योजनेतील लाभार्थ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.Mini Tractor Yojana.

📢 हे पण वाचा :- राज्यात 100% अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन चे वाटप ; आजच अर्ज करा..!

मिनी ट्रॅक्टरसाठी योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदान.

Mini Tractor Yojana शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाला चालना मिळावी व शेतकऱ्याचे उत्पन्न वाढून जीवनमान सुधारावे यासाठी राज्यातील अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकातील महिलांसाठी समाज कल्याण विभागामार्फत मिनी ट्रॅक्टर योजना राबवण्यात येते. व ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी 90% पर्यंत अनुदान देण्यात येते.

शेतकऱ्याला रोख एवढे अनुदान मिळते.

मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छित असणाऱ्या लाभार्थ्यांना 90% पर्यंत अनुदान देण्याची सोय आहे. ज्या अंतर्गत मिनी ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी 3 लाख 45 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. व उर्वरित दहा टक्के म्हणजे 35 हजार रुपयांचा भरणा संबंधित लाभार्थ्याला भरावा लागतो.

📢 हे पण वाचा :- दुष्काळग्रस्त 40 तालुक्यात उर्वरित 75 टक्के विमा वाटप सुरू ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश..!

योजनेअंतर्गत चे लाभार्थी कमी होण्यामागील कारणे.

योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी वर्षांनुवर्ष अनुदानात वाढ केली जाते. परंतु सद्यस्थितीला सर्वच वाहनांच्या किमती वाढल्या असल्यामुळे या अनुदानामध्ये देखील ट्रॅक्टर खरेदी होत नसल्याकारणाने योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होत आहे.व यामुळेच मागील 12 वर्षात केवळ 237 महिला बचतगटांनी योजनेचा लाभ घेतला आहे.Mini Tractor Yojana.

योजनेअंतर्गत ही उपसाधने दिली जातात.

योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या 3 लाख 45 हजार रुपये अनुदानामध्ये हार्वेस्टर, रोटर, कल्टीवेटर व ट्रेलर ही काही उपसाधने महिला बचतगटांना देण्यात येतात.

Leave a Comment