Monsoon Maharashtra 2024 हवामान विभागाचा नवीन अंदाज़ ; यावर्षी राज्यात कसा राहिल मानसून पाऊसपाउस पहा.

WhatsApp Group Join Now

Monsoon Maharashtra 2024 राज्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. परंतु हंगामाच्या सुरुवातीला पावसाने चांगलीच दडी मारली. व संपूर्ण पावसाळ्यात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कमी पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली. व पुढील काळामध्ये निसर्गाने त्याचा प्रकोप दाखवला ज्यामुळे अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ यांसारखी संकटे देखील राज्यातील शेतकऱ्यांसमोर उभे राहिली. परंतु यावर्षी पुन्हा एकदा हवामान विभागाने राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाची भरपाई होणार.

गेल्या वर्षी राज्यात मान्सून उशिराने दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्या करण्यास उशीर झाला व या पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेती उत्पन्न देखील कमी राहिले. या कमी प्रजन्यमानाला हवामान विभागाने अल निनो जिम्मेदार असल्याचे सांगत पाय उतार केला होता.Monsoon Maharashtra 2024.

हे पण वाचा :- सोयाबीनची मागणी वाढली ; सोयाबीन पुन्हा एकदा 6000 रुपये क्विंटल विक्री होणार-कृषिमंत्री..!

राज्यातील सध्याची पाण्याची स्थिती.

Monsoon Maharashtra 2024 गेल्या वर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने व पाणी पातळी खाली सरकल्याने राज्यात दिवाळीपासूनच खेडेगावात टँकरने पाणी पुरवठा होत आहे. तसेच राज्यातील मोठ्या धरणामध्ये पाणी साठा देखील सध्या शेवटच्या टप्प्यात आहे ज्यामुळे यावर्षी उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदरच राज्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते.

यावर्षी राज्यात चांगले पर्जन्यमान.

गेल्या वर्षी अलनिनोच्या प्रभावामुळे राज्यात पर्जन्यमान कमी राहिले परंतु यावर्षी जून महिन्यापर्यंत अलनिनोचा प्रभाव राहील व पुढे लनिनो कमकुवत होत असल्यामुळे यावर्षी लवकरच मान्सून पावसासाठी पोषक स्थिती तयार होऊन चांगली प्रजन्यमान होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

हे पण वाचा :- वाळु धोरणात बदल ; आता 600 रुपये ब्रास नाही तर 2000 रुपये ब्रासने मिळणार वाळु..!

या कारणामुळे राज्यात चांगला पाऊस होणार.

Monsoon Maharashtra 2024 देशात अलनिनोचा प्रभाव कमी होऊन लनिना चांगल्या प्रकारे देशात सक्रिय आहे त्यामुळे 2015-16 या कालावधीमध्ये चांगला प्रजन्यमान झाल्यामुळे यावर्षी देखील शेतकऱ्यांसाठी पावसाळ्याच्या अगोदरच आनंदाची बातमी समोर येत असून या काही कारणामुळे राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तले जात आहे.

भारतीय हवामान विभागाचा मोठा अंदाज.

गेल्या वर्षी भारतीय हवामाना विभागाने देशात चांगले पर्जन्यमान राहण्याचा अंदाज वर्तुळा होता आणि तो सपशेल फेल गेला असला तरी यावर्षी पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने देशात चांगले पर्जन्यमान होण्याचा अंदाज वर्तुळ आहे. व सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरण्या करण्यास गडबड करू नये जेणेकरून शेतकऱ्याला दुबार पेरणी करण्याचे संकट उभे राहणार नाही असे देखील आश्वासन हवामान विभागाने दिले.

Leave a Comment