खुशखबर..! ज्येष्ठांना मिळणार 3000 महिना पगार , 15 मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत. Mukhyamantri Vayoshri Yojana.

WhatsApp Group Join Now

 Mukhyamantri Vayoshri Yojana. राज्यातील 65 वर्षे वयोगटातील व त्यांवरील ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुसह्य व्हावे. व त्यांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व आणि अशक्तपणा यावर वैद्यकीय उपाययोजना करण्यासाठी व आवश्यक साह्य साधने आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून “मुख्यमंत्री वयोश्री” योजना राबवली जाते.

काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे की वय 65 वर्षांपेक्षा अधिक असेल, अशा नागरिकांसाठी आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी व आवश्यक साह्य साधने व उपकरणे खरेदीसाठी देण्याकरिता राज्य शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जाते.

📢हे पण वाचा :- दुधाच्या प्रति लिटर 5 रुपये अनुदानासाठी असा दाखल करा प्रस्ताव, तरच मिळेल अनुदान. .!

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे निकष.

Mukhyamantri Vayoshri Yojana. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असावी. तसेच लाभार्थ्याकडे सर्व प्रकारचे प्रमुख अधिकृत कागदपत्रे असायला हवीत. लाभार्थ्याने याआधी अशा प्रकारच्या कोणत्या राष्ट्रीय योजनेचा किंवा केंद्रीय पुरस्कृत योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत कोणकोणते लाभ मिळणार.

महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्याला चष्मा, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, सर्वाइकल कॉलर, कंबर बेल्ट,नि-ब्रेस व मानेचा बेल्ट यांसारख्या आवश्यक साह्य साधनांसाठी व उपकरणांसाठी राज्य साह्य साधनांसाठी व उपकरणांसाठी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे 3 हजार रुपये पर्यंत ची आर्थिक मदत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

📢 हे पण वाचा :- खुशखबर..! मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ व लाभ घेण्याचे आवाहन..!

योजनेसाठीचे आवश्यक कागदपत्रे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, आधार संलग्न राष्ट्रीय बँकेचे पासबुक, सक्षम अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे अर्ज करण्यासाठी आवश्यक आहे. Mukhyamantri Vayoshri Yojana.

अर्ज करण्याची शेवट तारीख.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी 15 मार्च 2024 पर्यंत संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाकडे वरील सर्व अधिकृत कागदपत्रांसोबत अर्ज सादर करायचा आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे योजनेअंतर्गत च्या कोणत्या साहित्याचा तुम्हाला लाभ हवा आहे हे अर्जात विशेष नमूद करणे आवश्यक आहे. Mukhyamantri Vayoshri Yojana.

Leave a Comment