Mukhyamantri vayoshri yojana ज्येष्ठ नागरिकांसाठी 3000/- प्रतीमहिना पगार जाहीर ; आजच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now

Mukhyamantri vayoshri yojana राज्यातील ६५ वर्षे वयांच्या व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.

सद्यस्थितीला महाराष्ट्र राज्यामध्ये 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांची संख्या दहा ते बारा टक्के आहे. व त्यांपैकी बहुतेक नागरिकांना वयोमानामुळे कोणत्या ना कोणत्या आजाराचा सामना करावा लागतो. आणि हीच बाब केंद्र शासनाने लक्षामध्ये घेऊन अशा आजारी व दुर्बल नागरिकांसाठी अर्थसहाय्य पुरवणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे.Mukhyamantri vayoshri yojana.

हे पण वाचा :- अखेर प्रतीक्षा संपली ; योजनेचा सोळावा हाफ्ता या तारखेला जमा होणार..!

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे उद्दिष्ट.

Mukhyamantri vayoshri yojana राज्यातील 65 वर्ष वयोगटातील व त्यावरील वयोवृद्ध, अपंग, दुर्बल व अश्क्त ज्येष्ठ नागरिकांना उपाय योजना करण्यासाठी व साह्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी 3000 रुपयांच्या मर्यादीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट अनुदान जमा करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष.
  • सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीचे वय 31 डिसेंबर 2023 पर्यंत 65 वर्ष पूर्ण असायला हवे.
  • सदर व्यक्तीकडे आधार कार्ड किंवा आधार कार्ड अर्ज केलेली पावती आणि स्वतंत्र ओळख दस्ताऐवज असायला हवे.
  • सदर व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये च्या आत असलेले स्वयंघोषणापत्र असणे आवश्यक आहे.
  • सदर व्यक्तीने मागील तीन वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर कोणत्याही सरकारी स्त्रोता करून कोणतेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर ; मोबाईलद्वारे यादीमध्ये तुमचे नाव कसे पाहायचे..!
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे.

१. आधारकार्ड / मतदान कार्ड.

२. राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स.

३. पासपोर्ट आकाराचे २ फोटो.

४. स्वयं-घोषणापत्र.

५. शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे.

योजनेच्या अनुदान वितरणाची कार्यपद्धती.

सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून आधार प्रमाणीकरण केले जाईल, व त्यानंतर बँक खाते व आधार जोडणी विभागाशी समन्वय करून देय रक्कम थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT माध्यमातून हस्तांतरित करण्यात येईल

Leave a Comment