NAMO SHETKARI INSTALLMENT NEWS नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हाप्ता एकत्र मिळणार ; नवीन शासन निर्णय आला.

WhatsApp Group Join Now

NAMO SHETKARI INSTALLMENT NEWS नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे कारण की 23 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. व या योजनेचा तिसरा हप्ता देखील दुसऱ्या आपल्या सोबत वितरित केला जाणार आहे का याबद्दलची देखील अधिकृत अशी माहिती आजच्या शासन निर्णयामध्ये दिली आहे.

आजच्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाने 23 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता राज्य शासनाच्या नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेअंतर्गत च्या तिसऱ्या प्त्याचे वितरण करण्यासाठी 2000 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.NAMO SHETKARI INSTALLMENT NEWS

पी एम किसानच्या सोळाव्या हाप्त्यासोबत नमोचा हप्ता मिळेल का.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी सोळाव्या हप्त्याचे वितरण हे 28 फेब्रुवारी 2024 रोजी 11 वाजून 30 मिनिटाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यामधील यवतमाळ येथून करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. व या सोळावे हप्त्याचे वितरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील ठिकाणाची नियुक्ती केल्यामुळे या सोळाव्या हत्या बरोबर महाराष्ट्र राज्य शासनाच्या नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची देखील वितरण केले जाईल अशी शक्यता आहे.

हे पण वाचा :- कांदा निर्यातीची धरसोड थांबेना ; केंद्र सरकार करणार ५४ हजार 760 टन कांदा निर्यात..!

नमोचा दुसरा हप्ता देखील 28 फेब्रुवारीला मिळणार.

NAMO SHETKARI INSTALLMENT NEWS केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना जाहीर केली व या योजनेचा पहिला हप्ता 26 नोव्हेंबर 2023 रोजी वितरित करण्यात आला.

जो की नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार माहे एप्रिल ते जुलै या कालावधीत वितरित करणे निश्चित होते. तर माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये दुसऱ्या हप्त्याचे वितरण करणे निश्चित होते व यासाठी मागील काही महिन्यापूर्वी राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित करून 1792 कोटी रुपये निधी मंजूर केला होता.

नमोच्या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी मंजूर.

यानंतर योजनेचा तिसरा हप्ता योजनेच्या वेळापत्रकानुसार माहे डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये वितरित करण्यासाठी आज राज्य शासनाने 2000 कोटी रुपयांचे वितरण करण्यास परवानगी दिली आहे. आपण एकंदरीत विचार केला तर सध्या नमो च्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्याचा कालावधी चालू आहे व राज्य शासनाने दुसऱ्या व तिसऱ्या दोन्ही हप्त्याचे वितरण करण्यासाठी निधी मंजूर केला असल्यामुळे या दोन्ही हप्त्यांचे वितरण एक सोबत देखील करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे पण वाचा :- फेब्रुवारी महिन्यामध्ये या आणखीण तीन योजनांचे १५ ते २० हजार रुपये जमा होणार..!

नमोचा दुसरा व तिसरा हप्ता 28 फेब्रुवारीला जमा होणार.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केल्यामुळे व पी एम किसान योजनेचे सर्व नियम आणि निकष या योजनेस लागू असल्यामुळे राज्य शासनाने पी एम किसान च्या प्रत्येक हप्त्यासोबत नमो शेतकरीच्या हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित करण्याचे निश्चित केले होते.

व पी एम किसान च्या आगामी सोळाव्या हप्त्या बरोबर नमोच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण केले जाईल अशी महाराष्ट्र राज्य शासनाने घोषणा केली नसली तरी, राज्य शासनाकडून नमोच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी निधीची घोषणा केल्यामुळे आता 28 फेब्रुवारीला पीएम किसान च्या सोळाव्याबरोबर नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे एकत्र वितरण करण्याची शक्यता ग्राह्य धरले जाऊ शकते.

Leave a Comment