Namo Shetkari Sanmannidhi Yojana अखेर राज्य सरकारने जाहीर केले की, नमोचा दुसरा हाप्ता 6000 रुपयांचाच मिळणार.

WhatsApp Group Join Now

Namo Shetkari Sanmannidhi Yojana शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेबद्दल ची आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो देशातील पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत च्या पात्र लाभार्थ्यांना येत्या 28 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत योजनेच्या सोळाव्या हप्त्याची वितरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.

नमोचा दुसरा हप्ता मिळणार 6000 रुपयांचा.

Namo Shetkari Sanmannidhi Yojana महाराष्ट्र राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना हा पीएम किसान चा सोळावा हप्ता एकत्र सहा हजार रुपये जमा होणार असल्याचे देखील महाराष्ट्र राज्य शासनातर्फे सांगितले जात आहे. कारण की शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली, आणि या योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोंबर 2023 रोजी वितरित करण्यात आला.

राज्य सरकारद्वारे नमोच्या दोन्ही हातांचे सोबत वितरण करण्याची घोषणा.

 त्यानंतर आता मागील तीन दिवसांपूर्वी राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित करून नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी 1792 कोटी रुपये निधी मंजूर केला. व या शासन निर्णयाच्या नंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एक शासन निर्णय निर्गमित करून नमच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरणासाठी देखील दोन हजार कोटी रुपयांचा नीधी मंजूर केला.

या दिवशी होणार नमोच्या हत्यांचे वितरण.

Namo Shetkari Sanmannidhi Yojana आणि पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्याच्या वितरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेच्या दोन्ही हप्त्याच्या वितरणासाठी निधी मंजूर केल्यामुळे आता या सोळाव्या हप्त्याबरोबर नमोच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे एकत्ररित्या वितरण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे पण वाचा :- कांदा निर्यातीची धरसोड थांबेना ; केंद्र सरकार करणार ५४ हजार 760 टन कांदा निर्यात..!

असा मिळणार नमोचा हप्ता 6000 रुपयांचा.

त्यामुळेच पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्यामधील पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये हे महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्यामधील यवतमाळ येथून वितरित केले जाऊ शकतात.

पुढील हाप्त्याच्या लाभासाठी या अटींचे पूर्तता करणे बंधनकारक.

तसेच महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाने नमूच्या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी मंजूर करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये असे देखील नमूद केले आहे की नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याच्या लाभासाठी केवळ तेच लाभार्थी पात्र असतील ज्यांची योजनेअंतर्गत ची ई केवायसी, आधार शेडिंग आणि भूमी अभिलेख नोंदी अद्यावत केलेले असतील. आणि अशाच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या 28 तारखेला एकत्र सहा हजार रुपयांचे वितरण करण्यामध्ये येणार आहे.Namo Shetkari Sanmannidhi Yojana.

Leave a Comment