Namo shetkari yojana 2nd installment अखेर नमो शेतकरी सन्माननिधि योजनेच्या दुसऱ्या हफ्त्याची तारीख जाहिर .

WhatsApp Group Join Now

Namo shetkari yojana 2nd installment महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला आहे. आणि आता आगामी दुसरा हप्ता देखील शेतकऱ्यांना नुकत्याच काही दिवसात वितरित करण्यात येणार आहे.

नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हफ्त्याची तारीख जाहिर .

नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना देण्यसाठी राज्य शासनाकडून संपुर्ण तयारी झाली आहे, म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे (NPCI), ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, ज्या शेतकऱ्यांच्या भूमिअभिलेख नोंदी pm किसान योजनेच्या पोर्टलवर अपडेट केल्या आहेत, तसेच ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचे हप्त्ये नियमितपणे मिळत आहे. Namo shetkari yojana 2nd installment

नमोचा दुसरा हप्ता 4000 जमा होणार.

तसेच या पात्र शेतकऱ्यांची यादी PM किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र सरकारकडे सुद्धा पाठवण्यात आली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचे पैसे सोबतच मिळण्याची शक्यता आहे, म्हणजेच शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचे मिळून 4000 हजार मिळतील.

हे पण वाचा :- पुढील ५ दिवसात देशासह या राज्यात अवकाळी पावसाची शक्यता ; आंबा पिकाला मोठा धोका..!

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून PM किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 6 हजार रुपये जमा करण्यात येतात, Namo shetkari yojana 2nd installment त्याच प्रमाणे राज्य सरकारने नमो शेतकरी योजना राज्यात सुरु करून केंद्राच्या योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात, राज्याच्या या योजनेमुळे केंद्राचे व राज्याचे मिळून असे एकुण शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12000 रुपये मिळतील.

योजनेच्या लाभार्थी संख्येत वाढ झाली आहे.

नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी राज्यातील 87.37 लाख शेतकरी पात्र झाले आहेत, तसेच या योजनेच्या पहिल्या हत्यासाठी लाभार्थ्यांची संख्या कमी होती. पहिल्या हप्त्यासाठी ही संख्या 85.60 लाख होती, त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी करून घेतली, तसेच, बँक आधार लिंक करून घेतले, तसेच या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शासनाकडून एक विशेष मोहीम सुद्धा राज्यात ठीक ठिकाणी राबविण्यात येत होती, त्यामुळे, नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लाभार्थी संख्येत वाढ झाली आहे.

हे पण वाचा :- अखेर प्रतीक्षा संपली ; योजनेचा सोळावा हाफ्ता या तारखेला जमा होणार..!
नमोचा दुसरा हप्ता या महिन्यात जमा होनार.

आता राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या लाभासाठी जी, यादी तयार करण्यात आली आहे, त्या यादीत 87.37 लाख शेतकरी पात्र झाले आहेत. तसेच या पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता देण्यासाठीचे नियोजन शासनाकडून करण्यात आले आहे, त्यानुसार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना फ़ेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 25 तारखेनंतर दिल जाण्याची शक्यता आहे. Namo shetkari yojana 2nd installment

या गोष्टीची पुर्तता करने आवश्यक.

अजूनही राज्यातील तीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यामुळे हे शेतकरी PM किसान योजनेचा 16 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसऱ्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.

तसेच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आणि PM किसान योजनेचा 16 वा हप्ता दोन्ही सोबत मिळण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण की, आता PM किसान योजनेचा 16 वा हप्ता येण्याचा कालावधी सुद्धा पूर्ण झाला आहे. Namo shetkari yojana 2nd installment

त्यामुळे या दोन्ही योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 4000 रुपये फ़ेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातसोबतच मिळू शकतात.

Leave a Comment