Namo Shetkari Yojana Installment शेतकऱ्यांना काल एकत्र 6000 रुपये जमा झाले ; पहा तुमचे पैसे कधी आणि कसे जमा होणार.

WhatsApp Group Join Now

Namo Shetkari Yojana Installment राज्यातील जवळपास 88 लाख पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये काल यवतमाळ येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकत्र पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हाप्त्याचे व नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात झाले.

पंतप्रधान यांच्या हस्ते महाडीबीटी द्वारे एक बटन दाबून या हप्त्याचे वितरण झाल्यानंतर लगेचच राज्यातील भरपूर साऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा झाले, परंतु राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार 90% लाभार्थ्यांच्या खात्यात एकत्र 6000 रुपये जमा झाले नाही.

त्यामुळे राज्यातील शेतकरी संभ्रम अवस्थेमध्ये आहेत की, केवळ पीएम किसानच्या हप्त्याचे 2000 रुपये मिळाले का किंवा नमोच्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळतील? तसेच तुम्हाला उर्वरित 4000 रुपये कधीपर्यंत आणि कसे मिळतील याबद्दल राज्य सरकारने सविस्तर माहिती जाहीर केली आहे जी की आपण आजच्या या लेखात जाणून घेऊया.

नमोच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण झाले नाही का ?

नमो शेतकरी योजनेच्या माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर या थकीत असलेल्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारने 1792 कोटी रुपये निधी वितरण करण्यास मान्यता दिली. व पुढील माहे डिसेंबर ते मार्च या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी 2000 कोटी रुपये निधी वितरण करण्यास मान्यता दिली व एकत्रित 3792 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात काल पंतप्रधान यांच्या हस्ते वितरित देखील करण्यात आले आहेत.Namo Shetkari Yojana Installment.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो ई-केवायसी करून घ्या ; ई-केवायसी मुळे तुमचे अनुदानाचे पैसे रखडले. पहा संपूर्ण यादी..!

शेतकऱ्यांना एकत्र 6000 रुपये का मिळाले नाही ?

शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या हप्ता वितरणाची संपूर्ण प्रक्रिया ही केंद्रीय पुरस्कृत बँकेतून होते. व त्यामुळेच महाडीबीटीच्या माध्यमातून एक बटन क्लिक करून या पी एम किसान च्या हप्त्याचे सरसकट वितरण होते. परंतु राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया ही महाराष्ट्र सेंट्रलाइज बँकेद्वारे होत असल्यामुळे या प्रक्रियास वेळ लागून हप्त्याचे पैसे संपूर्ण पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित होण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो.

कधीपर्यंत जमा होणार 6000 रुपये.

Namo Shetkari Yojana Installment राज्यातील पीएम किसान योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना आता 2000 रुपये जमा होतील तर दुसऱ्या व तिसऱ्या दोन्ही हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना आज दुपारपर्यंत किंवा उद्या 4000 रुपये जमा होतील. तसेच पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यास तुम्ही पात्र असल्यास 2000 हे कालच तुमच्या खात्यात जमा झाले असतील.

हे पण वाचा :- मार्च महिन्यापासून मिळणार मोफत वीज, लाईट बिल नाही ; मीटर काढली जाणार..!

नमो च्या हप्त्याचे पैसे मिळण्यास किती दिवसाचा कालावधी लागतो.

राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणा वेळेस देखील लाभार्थ्यांना हप्त्याचे पैसे चार ते पाच दिवसापर्यंत जमा होत होते. कारण की नमोच्या हप्त्याची सर्व प्रक्रिया राज्यस्तरीय बँकांमार्फत होत असल्यामुळे या हप्त्याचे पैसे जमा होण्यास अधिकचा वेळ लागतो. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत किंवा पुढील तीन ते चार दिवसात तुम्हाला नमोच्या देखील दोन्ही हप्त्याचे पैसे मिळून जातील.Namo Shetkari Yojana Installment

 

Leave a Comment