Namo shetkari yojana :- पि एम किसान व नमो शेतकरी योजनांचे हाप्ते फेब्रुवारी महिन्यातच जमा होणार.

WhatsApp Group Join Now

Namo shetkari yojana :- संपूर्ण देशातील पीएम किसान सन्माननिधीच्या लाभार्थ्यांसोबतच महाराष्ट्र राज्यामधील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची दोन्ही योजनेच्या आगामी हाप्त्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण की या फेब्रुवारी महिन्यामध्ये या दोन्ही योजनांचे हफ्त्यांचे एकत्र वितरण होणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे तर मग या फेब्रुवारी महिन्यामध्ये नेमक्या किती तारखेला आणि किती रुपयांचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती आज या लेखांमध्ये जाणून घेऊयात.

पी एम किसान योजनेचा हाप्ता जाहिर :- Namo shetkari yojana

पी एम किसान योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार योजनेचा 12 वा हाप्ता ऑक्टोंबर 2022 मध्ये वितरित करण्यात आला त्यानंतर योजनेचा 13 वा हाप्ता फेब्रुवारी 2023 मध्ये वितरित करण्यात आला व पुढील 14 वा हाप्ता 27 जुलै 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आला. आणि मागील पंधरावा हप्ताह 15 नोव्हेंबर 2023 रोजी वितरित करण्यात आला आहे. म्हणजे पी एम किसान योजनेचा प्रत्येक हप्ताह दर पाच महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला आहे. व या पद्धतीने पाहायला गेले तर योजनेचा आगामी 16 वा हाप्ता हा मार्च ते एप्रिल 2024 मध्ये सरकारला जमा करावा लागेल.

नमोचा हाफ्ता देखील याच महिन्यात जमा होणार :- Namo shetkari yojana

पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचा मागील पंधरावा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी जमा करण्यात आला तसेच महाराष्ट्र राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर 2023 रोजी हस्तांतरित करण्यात आला. व योजनेच्या नियमावली नुसार प्रत्येक हप्ता हा दर चार महिन्याच्या अंतराने वितरित करण्यात येत असतो.

शेतकऱ्यांना एकत्र ६००० रुपये जमा होणार :- Namo shetkari yojana

महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणाला काही तांत्रिक अडचणीमुळे उशीर झाला आणि या पहिल्या हाप्त्याचे वितरण पीएम किसानच्या पंधराव्या हप्त्यासोबत करणे सरकारला शक्य झाले नाही. परंतु या पुढील नमोचे प्रत्येक हप्ते पीएम किसान च्या पुढील हप्त्यांसोबतच वितरित करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

आणि त्यामुळेच आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आगामी दुसरा हप्ता देखील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी सोळाव्या आपल्या सोबत वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळेच या दोन्ही योजनांच्या आगामी हप्त्यांचे एकत्रित वितरण या फेब्रुवारी महिन्यांमध्ये करण्यात येणार आहे. ( Namo shetkari yojana )

कारण की शेतकरी मित्रांनो मार्च 2024 किंवा एप्रिल 2024 मध्ये देशामध्ये लोकसभेच्या आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणे शक्य मानले जात आहे आणि त्यामुळेच मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच संपूर्ण देशामध्ये आचारसंहिता लागू करण्यात येऊ शकते आणि या आचारसंहितेच्या अगोदरच या योजनांच्या हप्त्यांची वितरण सरकारला करावी लागणार आहे. ( Namo shetkari yojana )

तसेच मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या 20 ते 25 तारखेपर्यंत या दोन्ही योजनांच्या आगामी हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती देशामधील काही प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून देण्यात येत आहे, परंतु याबद्दल आतापर्यंत कोणतीच सरकारने अधिकृत अशी घोषणा देखील केलेली नाही त्यामुळे या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या दोन्ही योजनांच्या आगामी हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होते का हे देखील विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment