खुशखबर..! कापसाच्या भावात आज ८०० रुपयांची वाढ ,राज्यात कापुस दरात तूफान तेजी पहा आजचे भाव. New Cotton Rates.

WhatsApp Group Join Now

New Cotton Rates. राज्यातील शेतकऱ्यांकडील कापूस संपत आला आहे. या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी संपूर्ण हंगामात कापूस भाव वाढीची प्रतीक्षा केली परंतु कापसाच्या दरात सुधारणा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली. सध्या राज्यातील तुरळक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असताना मात्र कापसाच्या दरात सुधारणा होत असून काल राज्यातील सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल मागे 800 रुपयांची सुधारणा झाली होती.

कापसाच्या दरात 800 रुपयांची सुधारणा.

New Cotton Rates. यावर्षीच्या संपूर्ण कापूस हंगामा दबावत असलेले कापसाचे भाव काल एका दिवसात 800 रुपयांनी वाढले. मागील पंधरा दिवसांमध्ये 6800 ते 6900 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत असलेल्या कापूस काल 7700 ते 7900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत होता. तर बाजारात कापसाची आवक मात्र कमी प्रमाणातच असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

📢 हे पण वाचा :- मिनी ट्रॅक्टर योजनेच्या अनुदानात वाढ ; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन-अजित पवार..!

कापूस दरवाढी विषयी तज्ञांचे काय मत आहे.

हंगामाच्या शेवटी देशांमध्ये विशेष करून महाराष्ट्र राज्य मध्ये कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळत आहे. याबद्दल राज्यातील कापूस बाजार भाव तज्ञांशी संवाद साधल्यास, त्यांचे असे मत आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाची मागणी वाढल्यामुळे व राज्यात शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसल्यामुळे ही थोड्याफार प्रमाणात कापूस दरात तेजी आढळून येत आहे.

कापूस भाव किती रुपयापर्यंत वाढतील.

शेतकऱ्यांकडे शिल्लक नसलेला कापूस आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाला वाढलेली मागणी पाहता. जर राष्ट्रीय बाजारात कापसाची आवक अशीच होत राहिली तर आंतरराष्ट्रीय दर टिकून राहतील व याचा परिणाम देशांतर्गत बाजारात होऊन 8000 ते 8100-200 रुपयांपर्यंत मार्च महिन्यामध्ये कापसाची विक्री होऊ शकते.New Cotton Rates.

📢 हे पण वाचा :- राज्यात 100% अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन चे वाटप ; आजच अर्ज करा..!

आंतरराष्ट्रीय कापूस बाजाराची सद्यस्थिती.

आंतरराष्ट्रीय बाजारात विशेषता अमेरिका व चीन या मोठ्या कापूस उत्पादक देशांमध्ये यावर्षी कापूसाचे उत्पन्न कमी राहिले. व आंतरराष्ट्रीय देशांना कापसाचा पुरवठा करणाऱ्या भारत देशामध्ये देखील नैसर्गिक आपत्तीमुळे कापसाचे उत्पन्न घटले. व संपूर्ण कापूस हंगामात आंतरराष्ट्रीय देशांनी व उद्योगांनी कापूस खरेदी कडे भर दिला नाही. आणि आता हंगामाच्या शेवटी कापसाचा स्टॉक कमी असताना ही देशे कापसाची मागणी करत आहे.New Cotton Rates.

राज्यातील बाजार समिती मधील आजचे कापुस बाजार भाव.
बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
सोनपेठ  647 6988 7211 7755
काटोल  426 6544 6977 7322
परशिवानी  864 7322 7655 7533
उमरेड  322 6875 7121 7423
धानोरा  522 6974 7234 7532
परभणी  412 7123 7355 7454
मानवत  645 6488 6855 7243

Leave a Comment