शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! खरीप हंगामासाठी सरकार खतांचा साठा करणार व खतांच्या किंमती देखील जाहिर. New Fertilizer Price

WhatsApp Group Join Now

New Fertilizer Price महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी खतांचा तुटवडा भासू नये यामुळे राज्य शासनाने काही महत्त्वपूर्ण अशा निर्देश जाहीर केले आहेत. व या नवीन येत्या खरीप हंगामासाठी खतांचे दर काय असतील याबद्दल देखील राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित करून सविस्तर माहिती जाहीर केली आहे. तर मग येत्या खरीप हंगामात खताच्या नियोजनासाठी राज्य शासनाने काय निर्णय घेतले आहेत व काय असतील नवीन हंगामातील खतांचे भाव याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या लेखात जाणून घेऊया.

खताच्या नियोजनासाठी शासनाचा मोठा निर्णय.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाने दिनांक 15 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये येत्या खरीप हंगाम 2024 साठी युरिया व डीएपी खतांचा संरक्षित साठा करून ठेवण्याचे निर्देश जाहीर केला आहेत.

हे पण वाचा :- राशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी ; हे काम पूर्ण केले तरच मिळणार आता राशन, पहा नवीन नियम..!

पेरणीसाठी शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा.

शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाच्या जुन, जुलै व ऑगस्ट या महिन्यामध्ये खतांची मागणी, खतांची खरेदी व खतांचा प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो.
परंतु या काळामध्ये होत असलेल्या मान्सून पावसामुळे किंवा रस्ते वाहतूक बंद असणे, रेल्वे वाहतुकीस अडथळा निर्माण होणे तसेच खत उत्पादन कार्यान्वित नसणे इत्यादी कारणामुळे शेतकऱ्यांच्या खताच्या मागणीप्रमाणे पुरवठा करणे सरकारला शक्य होत नाही.
व हेच प्रमुख कारण लक्षात घेता राज्य सरकारने खताचा संरक्षित साठा करून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.New Fertilizer Price

खताच्या साठ्याबाबत काय घेतला आहे निर्णय.

खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी व उभ्या पिकांसाठी खतांची आवश्यकता असते. व याच शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे युरिया व डीएपी खताच्या पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने 1.50 लाख मॅट्रिक टन युरिया व 0.25 लाख मेट्रिक टन डीएपी खतांचा संरक्षित साठा करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत योग्य त्या दरामध्ये खतांचा पुरवठा होईल व शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे कोणत्याही अडथळा विना शेतकऱ्यांना खताचा पुरवठा करणे शक्य होईल.

खतांचा संरक्षित साठा करण्याचे फायदे.

राज्य सरकारकडून खतांचा संरक्षित साठा केल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी व पिकांच्या पोषणासाठी खतांचा तुटवडा निर्माण होणार नाही.
परिणामी कृषी सेवा केंद्र दुकानदारांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे होणारे लूट थांबणार आहे.New Fertilizer Price
राज्य शासनाकडे शेतकऱ्यांना हवा तेवढा खतांचा साठा शिल्लक असल्यामुळे खतांचे दर हे नियंत्रण राहतील.
शेतकऱ्याला हवे तेव्हा व हवे तेवढे खत उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांची ऐन पेरणीच्या वेळेस होणारी धावपळ कमी होईल.

Leave a Comment