New Sand Policy 2024 वाळु धोरणात बदल ; आता 600 रुपये ब्रास नाही तर 2000 रुपये ब्रासने मिळणार वाळु.

WhatsApp Group Join Now

New Sand Policy 2024 राज्यातील नागरिकांना स्वस्त दरामध्ये वाळू उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारने वाळू धोरण आखले होते. व या धोरणांतर्गत 600 रुपये ब्रास दराने नागरिकांना वाळू देण्यात येत होती. परंतु या जुन्या वाळू धोरणात बदल करून सरकारने नवीन वाळु धोरण जाहीर केले आहे.आणी आता नागरिकांना 2000 ब्रास दराने वाळुचे वितरण करण्यात येणार आहे.

राज्य शासनाचे 2023 चे वाळू धोरण.

राज्यात होत असलेली वाळू चोरी थांबवण्यासाठी व राज्यात वाढलेले वाळूचे दर नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात नवीन वाळू धोरण लागू करून पारंपारिक वाळूच्या वितरणाला आळा घातला. व या धोरणाअंतर्गत वाळू डेपोची निर्मिती करून या डेपोचे टेंडर काढले जात होते व त्या अंतर्गत नागरिकांना वाळूचे वाटप केले जात होते.New Sand Policy 2024.

हे पण वाचा :- या जिल्ह्यातील पिक विमा नुकसान भरपाईच्या लाखो पूर्वसूचना फेटाळल्या, पहा संपूर्ण यादी..!

असे असेल नवीन वाळू धोरण.

वाळू धोरण 2023 अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना सहाशे रुपये ब्रास या दराने वाळूचे वाटप करण्यात यावे या धोरणात बदल करून आता नवीन धोरण अंतर्गत नागरिकांना 2000 रुपये ब्रास पेक्षा अधिक दराने राज्य शासन वाळू देणार आहे. तसेच संबंधित नागरिकांनी खरेदी केलेली वाळू डेपो पासून त्यांच्या घरापर्यंत नेण्याचा वाहतूक खर्च देखील स्वतः करावा लागणार आहे.

वाळू संनियंत्रण समिती करणार वाळू वाटप.

New Sand Policy 2024  राज्यात लागू केलेल्या नवीन वाळू धोरणाअंतर्गत वाळूचा उपसा व वाळूचे वितरण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय वाळू संनियंत्रण समिती निर्माण करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यातील वाळूचा साठा व वाळूची मागणी विचारात घेऊन ही समिती वाळू ग्राहक, सर्वसामान्य नागरिक, घरकुल लाभार्थी, शासकीय यंत्रणा व बांधकाम व्यवसायिकांना वाळूचे नियोजनबद्ध वितरण करण्याचा संपूर्ण निर्णय या समितीकडे असेल.

हे पण वाचा :- अर्थसंकल्पीय अधिवेशन घोषणा ; अवकाळी पाऊस अनुदानासह दूध अनुदानासाठी निधीची तरतूद..!

नवीन धोरणानुसार वाळू वाटपाचे गणित.

उदाहरणार्थ नवीन वाळू धोरणानुसार एक ब्रास वाळूसाठीचे 600 रुपये, जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे 60 रुपये, SI खर्च 16 रुपये असे एकूण 676 रुपये व वाळूचे टेंडर प्रतिब्रास 1450 रुपयांनी दिले गेल्यास 2116 रुपयांपर्यंत प्रतिब्रासने सर्वसामान्य नागरिकांना वाळूचे वाटप केले जाऊ शकते.New Sand Policy 2024.

अशाप्रकारे मिळणार नागरिकांना वाळू.

वाळू खरेदी करण्यास इच्छुक ग्राहकांना पूर्वीप्रमाणे महा खनिज या अधिकृत वेबसाईटवर अर्ज सादर करायचा आहे. तसेच तुमच्या नजीकच्या सेतू केंद्रा वर देखील वाळूसाठी अर्ज सादर केला जाऊ शकतो.New Sand Policy 2024.

 

Leave a Comment