राज्यात या शहरात उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम ; राज्यमंत्र्याची मोठी घोषणा. New Stadium In Maharashtra

WhatsApp Group Join Now

New Stadium In Maharashtra भारत देशामध्ये क्रिकेटचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी क्रिकेटवर प्रेम करणारा व्यक्ती असतोच. त्यामुळेच भारतीय क्रिकेट संघामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंचा समावेश आहे. सचिन धस हा असाच एक भारतीय अंडर १९ संघात गवसणी घातलेला महाराष्ट्रातील बीडचा खेळाडू ठरला, ज्याने अंडर १९ विश्वचषकात चांगली कामगिरी करून सर्व देशातील लोकांचे लक्ष वेधले होते. अशाच प्रकारे बीड जिल्ह्यातुन क्रिकेटपटू घडण्यासाठी व यांच्या खेळाला वाव मिळण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील परळी शहरात उच्च दर्जाच्या क्रीडा संकुची घोषणा केली आहे.

या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे बीडमध्ये जोरदार स्वागत.

New Stadium In Maharashtra राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहरामध्ये नाथ प्रतिष्ठान आयोजित नामदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. व याच स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी भारताचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू युवराज सिंग व झहीर खान हे काल बीडच्या दौऱ्यावर होते. व त्या दोघंचेही बीड जिल्ह्यातील लोकानी जोरदार स्वागत केले.

📢 हे पण वाचा :- लेक लाडकी योजनेने कुटुंब होणार लखपती ; योजनेच्या अनुदान रक्कमेत वाढ..!

युवराज व झहीर खान यांच्या हस्ते बक्षीस वितरण.

नाथ प्रतिष्ठान आयोजित नामदार चषक टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धेचे प्रथम व द्वितीय बक्षीस युवराज सिंग व जाहिर खान यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. त्यावेळेस राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व इतर स्थानिक मान्यवर उपस्थित होते. व त्याठिकाणी दोनिही खेळाडूणी स्थानिक खेळाडूणा मार्गदर्शन केले.विशेष म्हणजे जाहिर खानने मराठीतुन केलेल्या भाषनाने लोकांची मने जिंकली.

धनंजय मुंडे यांची क्रिकेट स्टेडियम उभारणीची घोषणा.

New Stadium In Maharashtra धनंजय मुंडे यांचा जिल्हा असलेल्या बीड जिल्ह्यातून यावर्षी प्रथमच बीडचा खेळाडू सचिन धस हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. अशाच प्रकारे बीड जिल्ह्यातून नवनवीन आणि उत्तम दर्जाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मिळावे यासाठी धनंजय मुंडे यांनी कालच्या परळीतील बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमातून परळी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट संकुलच्या उभारण्याची घोषणा केली.

📢 हे पण वाचा :- राज्यात 100% अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन चे वाटप ; आजच अर्ज करा. Silai Machine Yojana 2024..!

अवघ्या चार महिन्यात उभे राहणार स्टेडियम.

कृषी मंत्री धनंजय मुंडे हे देखील क्रिकेटचे मोठे चाहते असल्यामुळे, या क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वतः धनंजय मुंडे यांनी समावेश घेतला होता. व या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात भाषण करताना परळीतील या क्रीडा संकुलासाठी 66 कोटी पेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले व अवघ्या चार ते पाच महिन्यात या संकुलाचे काम पूर्णत्वाला नेणार असल्याची देखील त्यांनी ग्वाही दिली.

या क्रीडा संकुलात या सुविधा मिळणार.

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुल मध्ये क्रिकेट शिवाय कबड्डी, खो-खो, कुस्ती, टेनिस व इतर सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांची मैदानी उभारण्यात येणार आहेत. तसेच या क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी उच्च दर्जाच्या प्रशिक्षक देखील असणार आहेत.New Stadium In Maharashtra.

 

 

Leave a Comment