NUKSAN BHARPAI 2020-22 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतिपिके व मालमत्तांच्या झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे आले.

WhatsApp Group Join Now

NUKSAN BHARPAI 2020-22 राज्य सरकारने राज्यात 2020-22 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व चक्रीवादळ यामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तांच्या नुकसान भरपाईपोटी आर्थिक मदत करण्यासाठी राज्य शासनाने आज एक शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केला आहे.ज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे झालेले नुकसान व चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या घराचे तसेच इतर मालमत्तांचे झालेले नुकसान यांचा या नुकसान भरपाई मध्ये राज्य शासनाने समावेश केला आहे, यासाठी 106 कोटी 64 लाख 94 हजार रुपये निधी वितरण करण्यास मान्यता दिली आहे

2020-22 ची नुकसान भरपाई आली.

NUKSAN BHARPAI 2020-22 महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2020 22 मध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिके व इतर मालमत्तांच्या झालेल्या नुकसानी पोटी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आज दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने 106 कोटी 64 लाख 94 हजार रुपये निधी वितरणास मान्यता दिली आहे.

हे पण वाचा :- अखेर केंद्र सरकारने जाहीर केले की फेब्रुवारीच्या किती तारखेला सोळावा हप्ता जमा होणार ; जाणून घ्या तारीख.

अखेर शेतकऱ्यांचे सर्व प्रस्ताव राज्य शासनाला मान्य.

सन 2020 22 च्या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले व काही शेतकऱ्यांची खरे तर काही व्यवसायिकांचे दुकाने आणि इतर मालमत्तांचे देखील प्रचंड नुकसान झाले होते. याबद्दलचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. परंतु मागील वर्षांमध्ये राज्यात कोविड-19 च्या उद्भवलेल्या जागतिक महामारीमुळे या प्रस्तावाकडे राज्य शासनाला लक्ष देता आले नाही.NUKSAN BHARPAI 2020-22

प्राप्त प्रस्तावांसाठी निधीची घोषणा.

राज्य शासनाने 05 जून 2023 पर्यंत राज्य शासनाकडे प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव ग्राह्य धरून या सर्व बाधित शेतकऱ्यांसाठी 05 जून 2023 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून राज्य शासनाने 401 कोटी 70 लाख 70 हजार रुपये निधी वितरणास मान्यता देण्यात आली होती.

हे पण वाचा :- नमोच्या हाफ्त्याची देखील तारीख जाहिर ; हाफ्ता वित्ररणाचा शासन निर्णय आला..!

अशी होणार नुकसान भरपाई वाटप.

राज्य शासनाकडे प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावांसाठी राज्य शासनाने 05 जून 2018 निधी जाहीर केला होता परंतु प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावांसाठी आज निधी मंजूर केला आहे. व ज्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या घटनेवेळी पंचनामे सादर केले होते, व निधी मागणीची द्विरुकती झाली नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे.

Leave a Comment