Nuksan bharpai 2023 :- या जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी 322 कोटी रुपये अनुदान मंजूर.

WhatsApp Group Join Now

Nuksan bharpai 2023 :- राज्यात मागील वर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर मोठा फटका बसला आणि याच मागील नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या नुकसान भरपाईच्या वितरणासाठी राज्य सरकारने 332 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे व पात्रतेच्या निकषानुसार याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात येणार आहे.

बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर :-

राज्यात मागील नोव्हेंबर महिन्यामध्ये मानसूनोत्तर अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या राज्यातील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा आता संपली आहे आणि राज्यातील या जिल्ह्यातील दोन लाख 46 हजार 188 बाधित शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे मदतीचे प्रस्ताव दाखल केले होते. Nuksan bharpai 2023

आणि याच बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने काल एक शासन निर्णय निर्गमित करून 332 कोटी 96 लाख रुपये मंजूर केले आहेत आणि हा मंजूर निधी तात्काळ आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरणाच्या निकषाप्रमाणे वाढीव दरांसह वितरित करण्यात येणार आहे.

हे ही वाचा :- राज्यातील या महिलांना होणार मोफत नऊवारी साडीचे वाटप.
शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची प्रतिक्षा संपली :-

अकोला जिल्ह्यामध्ये 27 व 29 नोव्हेंबर रोजी चक्रीवादळ, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या कापूस व तुर पिकाचे अतोनात नुकसान झाले होते, त्यामुळे शासनाकडे या नुकसान भरपाई साठी 207 कोटी 92 लाख 46 हजार 810 रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. परंतु शासनाने दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर अशी मर्यादा वाढवल्यामुळे हा नवा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. Nuksan bharpai 2023

आता या सादर केलेल्या दोन्ही प्रस्तावांना एकत्रितरित्या महसूल विभागाकडून मंजुरी देण्यात आली असून, भाजीत शेतकऱ्यांना यादी एन डी आर एफ च्या निकषानुसार दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये मदत केली जात होती परंतु शासनाने यात वाढ करून त्याची मर्यादा तीन हेक्टर पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा :-अखेर प्रतीक्षा संपली ; योजनेचा सोळावा हाफ्ता या तारखेला जमा होणार.

बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत :-

आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बाधित कोरडवाहू क्षेत्रासाठी 8 हजार 500 रुपयांऐवजी तेरा हजार पाचशे रुपये तर बाधित बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी सतरा हजार रुपयांऐवजी 27 हजार रुपये तर फळ पिकांच्या नुकसान भरपाईकरिता 22 हजार 500 रुपयांऐवजी 36 हजार रुपयांची मदत वितरित करण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे.

गत वर्षापासून राज्य शासनामार्फत नुकसान भरपाई चे अनुदान हे महाडीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यामध्ये येत आहे, व त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड होणे आवश्यक असते व याची तहसील स्तरावरून कार्यवाही देखील चालू आहे.

Leave a Comment