ONION EXPORT BAN अखेर कांद्यावरील निर्यात बंदी मागे ; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now

ONION EXPORT BAN देशात इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कांद्याचे उत्पन्न अधिक घेतले जाते. व यावर्षी देशात कांद्याला मिळत असलेला कमी दर आणि केंद्र सरकारने कांद्यावर घातलेली निर्यात बंदी यामुळे कांद्याचे दर घसरले. व या निर्णयाविरुद्ध शेतकऱ्यांकडूनदेशभरात आंदोलने व मोर्चे निघाली. आता कुठेतरी शेतकऱ्यांच्या हिताचा केंद्र शासनाने निर्णय घेतला आणि कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.

निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय.

सध्या देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात पंजाब मधील शेतकऱ्यांनी शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी आंदोलन छेडले आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात सर्वाधिक पिकल्या जाणाऱ्या कांद्यावर निर्यात बंदी लावल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी नाराज होता. याच गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.ONION EXPORT BAN.

एवढ्या कांद्याची होणार निर्यात.

कांद्यावर घातलेली निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवले असून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देशामधून तीन लाख टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.ONION EXPORT BAN.

हे पण वाचा :- वाळुसाठी ऑनलाइन अर्ज चालु ; या लोकांना मिळणार मोफत वाळू..!

मुदतीच्या आत निर्यात बंदी उठवली.

ONION EXPORT BAN देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्याचे कारण देत केंद्र सरकारने ८ डिसेंबर 2023 रोजी कांद्यावर निर्यात बंदी घातली होती. ही निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत निश्चित केली होती. व कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आणि याच निर्णयामुळे देशांतील शेतकऱ्यांमध्ये सरकार विरुद्ध नाराजगी चे वातावरण तयार झाले होते.

निर्यात बंदीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान.

देशांतर्गत कांद्यावर निर्यात बंदी लागू केल्यामुळे कांद्याचे भाव गडबडले होते. सध्या देशांतर्गत कांद्याला 900 ते 1200 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे. व या निर्यात बंदीमुळे शेतकऱ्याचे जवळपास दोन हजार कोटी पेक्षा जास्त रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

हे पण वाचा :- सुकन्या समृद्धी योजना- मुलींच्या खात्यावर 5 हजार रुपये जमा करून मिळणार 27 लाख रुपये..!

शेजारील देशांमध्ये कांद्याला सर्वोत्तम भाव.

आपल्या शेजारील देशांमध्ये मागील तीन महिन्यांमध्ये कांद्याचा दर पन्नास रुपये प्रति किलोच्या वर सरकला होता. यामध्ये श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान व भूतान या देशाचा समावेश होतो.ONION EXPORT BAN.

बाजारात नवीन कांदा येणार.

राज्यात नगर हे कांदा पिकाचे आगार म्हणून ओळखले जाते त्या पाठोपाठ कोल्हापूर, नगर, सोलापूर, पुणे व मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये कांद्याचे पीक घेतले जाते. व अवघ्या पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा उन्हाळी लाल कांदा बाजारात विक्रीसाठी येणार आहे, आणि याचा देखील कांद्याच्या दारावर मोठा परिणाम होईल.

Leave a Comment