onion export duty शेतकऱ्यांची फसवणूक ; कांदा निर्यातबंदी उठवली नाही परंतु, कांदा दरात सुधारणा.

WhatsApp Group Join Now

onion export duty महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पिकवली जाणारे पीक म्हणजे कांदा आणि मागील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात सुरू असलेल्या कांदा बंदी उठवली या चर्चांमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते व त्या चर्चांमुळे राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा देखील पाहायला मिळाली. परंतु ही बातमी खोटी असून कांदा निर्यात बंदी कायम असल्याचे स्वतः केंद्र शासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल स्पष्ट केले.

कांदा निर्यात बंदी उठवली नाही.

onion export duty 20 फेब्रुवारी रोजी देशातील मोठ्या न्यूज चैनल कडून तसेच वर्तमानपत्रामध्ये देखील कांदा निर्यात बंदी उठवली गेली असल्याच्या बातम्या प्रकाशित झाले होत्या. परंतु यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे 31 मार्चपर्यंत देशांतर्गत कांदा निर्यात करण्यास बंदी कायम असल्याचे केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

हे पण वाचा :- ऊसतोड कामगारांना मोठा दिलासा ; अपघात विम्यास पाच लाख रुपये अनुदान..!

कांद्याच्या दरात काल मोठी वाढ.

onion export duty देशांतर्गत कांदा निर्यात बंदी हटवली गेली असल्याच्या देशभर बातम्या प्रकाशित होत होत्या व यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते तर याच बातमीचा परिणाम राज्यातील कांदा बाजारावर झाला आणि बाजारात कांद्याच्या दरात विक्रमी वाढ नोंद केली.

या बाजार समितीत कांद्याला काल विक्रमी भाव.

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली घेण्याच्या वृत्तानंतर देशातील बाजारात कांद्याचे भाव सुधारले व महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठी खाऊ कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारपेठेमध्ये सोमवारी कांद्याचे दर 1280 रुपये प्रति क्विंटल वरून थेट 1800 रुपये प्रति क्विंटल वर पोहोचले. काल या बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात 40.65% वाढ पहायला मिळाली.onion export duty.

हे पण वाचा :- कृषि विभागाची विशेष मोहिम पूर्ण ;अवघ्या दोनच दिवसात होणार दूसरा हाफ्ता जमा..!

31 मार्च नंतर ही निर्यात बंदी कायम राहण्याचे अंदाज.

केंद्र सरकारने देशांतर्गत कांदा निर्यात करण्यास 8 डिसेंबर 2023 रोजी बंदी घातली ही निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे देशांतर्गत नवीन कांदा लागवडीचे क्षेत्र कमी झाले, त्यामुळेच या रब्बी हंगामात महाराष्ट्र मध्ये कांद्याचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. यामुळेच 31 मार्चनंतर ही देशांतर्गत कांदा निर्यात बंदी कायम राहू शकते असा बाजारातील तज्ञांचा अंदाज आहे.onion export duty.

 

Leave a Comment