शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! दुबईत 14 हजार तर बांगलादेशात 50 हजार टन कांदा निर्यात होणार. Onion Export News Today.

WhatsApp Group Join Now

Onion Export News Today. बांगलादेशात भारतातून कांद्याची निर्यात होणार अशी केंद्र सरकारने घोषणा केली परंतु याच्या अधिसूचनेकडे शेतकऱ्यांच्या लक्ष लागले होते. आता या आदेशाने बरोबर संयुक्त अरब अमिराती ( युएई ) मध्ये देखील कांद्याची निर्यात करण्याची अधिसूचना केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने सोमवारी 4 मार्च 2024 रोजी काढली आहे.

कांदा निर्यातीची अधिसूचना आली.

केंद्र सरकारने जाहीर केलेली मूळ निर्यात बंदी कायम ठेवत भारत लगतच्या बांगलादेशात 50 हजार टन व संयुक्त अरब अमिराती ( युएई ) मध्ये 14 हजार 400 टन अशा एकूण 64 हजार 400 टन कांद्याची निर्यात करण्याचे अधिसूचना केंद्र सरकारने काल सोमवारी जाहीर केली. सद्यस्थितीला भारत केवळ या मित्र देशांमध्ये कांद्याची निर्यात करणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले.Onion Export News Today.

📢 हे पण वाचा :- खुशखबर..! या जिल्ह्यातील लोकांना किराणा दुकानासाठी ८५% अनुदान, योजनेसाठी आजच अर्ज करा..!

भारताचे 2023 चे कांदा निर्यातीचे आकडे.

Onion Export News Today. भारत देशामध्ये बहुतेक राज्यात कांद्याचे चांगले उत्पन्न होते. व गेल्या वर्षी देशांतर्गत निर्यात बंदी नसल्यामुळे भारताने बांगलादेश, मलेशिया आणि यूएई या प्रमुख कांदा आयातदार देशामध्ये 1 एप्रिल 2023 ते 4 ऑगस्ट 2023 या पाच महिन्याच्या काळामध्ये 9.45 लाख टन कांदा निर्यात केला होता. व याच्या तुलनेत सध्याचे कांदा निर्यात खूपच कमी असल्याचे मत व्यापारी मांडत आहेत.

व्यापारी वर्गातून या निर्णयाला विरोध.

या कांदा निर्यातीच्या अधिसूचनेबाबत व्यापाऱ्यांना त्यांचे मत विचारल्यावर ते म्हणाले की कांदा उत्पादनामध्ये आघाडीवर असणाऱ्या आपल्या देशातून केवळ दोन ते तीन देशांमध्ये तेही 50 ते 60 हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देणे ही बाब शेतकऱ्यांसाठी मोठी अन्यायकारक आहे. यामुळे या निर्णयाचा व्यापारी वर्गातून विरोध दर्शविला जात आहे.

📢 हे पण वाचा :- खुशखबर..! कापसाच्या भावात आज ८०० रुपयांची वाढ ,राज्यात कापुस दरात तूफान तेजी पहा आजचे भाव..!

या निर्यातीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही.

सोमवारी केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाने बांगलादेशात 50 हजार टन व युएई मध्ये 14,400 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली. कारण की बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कांद्याची खरेदी करते वेळेस स्पर्धात्मक पद्धतीने कांद्याची खरेदी केली जाते त्यामुळे भावात वाढ होत असते. परंतु सध्याची कांदा निर्यात ही केवळ एक निर्यातदार करत असल्यामुळे या अंतर्गत स्पर्धा नाही त्यामुळे देशांतर्गत कांद्याचे दर आहे तसेच राहतील व याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही.Onion Export News Today.

Leave a Comment