Onion subsidy maharashtra कांदा अनुदानाचे पैसे आले ; प्रति शेतकरी 70000 रुपये अनुदान, पहा शासन निर्णय.

WhatsApp Group Join Now

Onion subsidy maharashtra महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने गुरुवारी 08 फेब्रुवारी 2024 रोजी सन 2022 23 या कालावधीत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना सरसकट 70000 रुपये अनुदान .

राज्यातील ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दि.01 फेब्रुवारी 2023 ते दि. 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, खाजगी बाजार समित्यांमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकांकडे किंवा थेट नाफेड कडे लेट खरिपातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल किंवा जास्तीत जास्त 200 क्विंटल च्या मर्यादेमध्ये प्रति शेतकरी रुपये 70 हजार अनुदान मंजूर करण्याचा शासन निर्णय घेतला आहे. Onion subsidy maharashtra.

हे पण वाचा :- अखेर प्रतीक्षा संपली ; योजनेचा सोळावा हाफ्ता या तारखेला जमा होणार..!
अनुदान वितरणाचा सविस्तर शासन निर्णय.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये, खाजगी बाजार समित्यामध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकांकडे अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे,

Onion subsidy maharashtra अनुदान मंजूर करण्यासाठी विधीमंडळाच्या सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या रू. ३०१,६६,९३,०००/- इतक्या निधीपैकी ७० टक्के मर्यादेत रु.२११.१६ कोटी इतकी रक्कम वितरीत करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे.

या शेतकऱ्यांना अनुदानाच्या चौथ्या टप्प्याचे वितरण.

कांदा अनुदान वितरणा संदर्भात रू.१०.०० कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक १० जिल्हयातील लाभार्थ्यांना अनुदान देण्याची रक्कम रू. २४,०००/- पेक्षा जास्त असल्याने पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात रु. २४,०००/- इतक्या कमीत कमी मर्यादेत अनुदान वितरीत करण्यात आले आहे, अशा लाभार्थ्यांना अनुदानाच्या चौथ्या टप्प्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

हे पण वाचा :- अखेर नमो शेतकरी सन्माननिधि योजनेच्या दुसऱ्या हफ्त्याची तारीख जाहिर ..!
असे प्रकारे होणार कांदा अनुदानाचे वितरण.
  • ज्या कांदा उत्पादकांची अनुदानाची देय रक्कम रु. ४४,०००/- पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी संपूर्ण अनुदानाची रक्कम ( पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्यातील अदा केलेले रु. २४,०००/- अनुदान अंतर्भूत करुन) अदा करण्यात यावी.
  • तसेच ज्या शेतकऱ्यांची अनुदानाची देय रक्कम रु.४४ हजार अथवा रू. ४४ हजारांपेक्षा पेक्षा जास्त आहे, (पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्यातील अदा केलेले रु. २४ हजार अनुदान अंतर्भूत करुन) त्या लाभार्थांसाठी चौथ्या टप्यात रु. २० हजार इतक्या कमाल मर्यादेत अनुदानाची रक्कम अदा करण्यात यावी.
  • तसेच एकाच लाभार्थ्यास दुबार अनुदान वितरित होणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी.

 

Leave a Comment