Petrol-Diesel Rates Today :- पेट्रोल-डिझेल होणार तब्बल ५ ते ६ रुपयांनी स्वस्त ; पहा मार्च महिन्याचे दर.

WhatsApp Group Join Now

Petrol-Diesel Rates Today :- युक्रेन युद्धाच्या काळामध्ये तेल कंपन्यांचे मोठे नुकसान झाले होते. आणि या काळात झालेल्या नुकसानीसाठी सरकारने तेल कंपन्यांना 52 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे अनुदान दिले होते. व त्यानंतर लगेचच युक्रेन युद्ध थंड होऊन कच्चे तेल स्वस्त झाले व त्यामुळे या तेल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नफा कमवला होता. तरीही या तेल कंपन्यांची पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचे तयारी नाहीये.

चालू वर्षात कंपन्यांना मोठा फायदा :- 

भारताच्या तेल बाजारावर प्रमुख तीन कंपन्यांचे वर्चस्व आहे ज्यामध्ये इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांचा समावेश होतो.व चालू आर्थिक वर्षामध्ये या तीन सरकारी तेल कंपन्यांनी एकूण ६९ हजार कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमवला आहे. व यांचे युक्रेन युद्धा दरम्यान झालेले नुकसान केव्हाचेच भरून निघाली आहे.

हे पण वाचा :-  राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज ; या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता..!

तेल कंपन्यांची सद्यस्थिती :-

देशात सद्यस्थितीला 86 हजार 855 पेट्रोल पंप आहेत. ज्यात 78 हजार 501 पेट्रोल पंप हे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन कंपन्यांची आहेत व उर्वरित 6386 नायरा एनर्जी कंपनीचे व 1555 रिलायन्स बिपी या कंपनीचे पेट्रोल पंप आहेत.

कच्च्या तेलाच्या दरात स्थिरता :- 

युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात कच्च्या तेलाचे दर वाढले होते आणि त्याचा मोठा फटका भारतीय तेल कंपन्यांना देखील पडला परंतु सध्या कच्च्या तेलाच्या दरामध्ये पुन्हा एकदा स्थिरता आली असून, एप्रिल 2022 मध्ये 140 डॉलर प्रति बॅलरपर्यंत गेलेले कच्च्या तेलाचे दर आता सरासरी 80 डॉलर प्रति बॅलरपर्यंत खाली आले आहेत.

हे पण वाचा :- अखेर प्रतीक्षा संपली ; योजनेचा सोळावा हाफ्ता या तारखेला जमा होणार..!

पेट्रोलियम मंत्री यांचे नवीन धोरण :-

जगात उद्भवलेल्या काही मोठ्या संकटामुळे मागील काही दिवसात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या त्यामुळे तेल कंपन्यांना डिझेल विक्री मागे 3 रुपये प्रति लिटर तोटा होत होता, पेट्रोल वरील नफा देखील घटला आहे , मागील काही दिवसात तेल कंपन्यांनी चांगला नफा कमावला परंतु हीच सद्यस्थिती कायम राहिल्यास देशात लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त होऊ शकतात हरदिपसिंग पुरी पेट्रोलियम मंत्री.

कच्च्या तेलाचे दर ( डॉलर मध्ये ) व पेट्रोल डिझेलचे दर. 

 

महिना कच्चे तेल पेट्रोल डिझेल
मार्च २०२२ १४० १०१.८५ ९३.११
डिसेंबर २०२२ ७८.१० ९६.७६ ८९.६६
फेब्रुवारी २०२३ ७६.६३ ९६.७६ ८९.६६
नोव्हेंबर २०२३ ८३.४६ ९६.७६ ८९.६६
डिसेंबर २०२३ ७७.४२ ९६.७६ ८९.६६
फेब्रुवारी २०२४ ७४.९७ ९६.७६ ८९.६६

Leave a Comment