Pik Vima Yojana 2022-23 अखेर पिक विम्याचे वाटप सुरु ; पहा पिक विमा मंजूर जिल्ह्यांची सविस्तार यादी.

WhatsApp Group Join Now

Pik Vima Yojana 2022-23 राज्यातील शेतकऱ्यांचे 2020, 2021, 2022 वर्षांमधील थकीत देयके मार्गी लावून राज्य सरकार यांचे वितरण करत आहे. पुढील काळात देशात व राज्यात होणार असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई, अवकाळी पाऊस अनुदान, पिक विमा व कर्जमाफीची देखील मदत मिळू शकते. व यांचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय देखील जाहीर करत आहे.

राज्य शासनाकडून शेतकऱ्यांचे सर्व थकीत अनुदानाचे वाटप.

Pik Vima Yojana 2022-23 राज्यात ऑक्टोबर नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे वाटप करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे‌. तसेच 2021-22 मधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे व जुलै ते ऑक्टोंबर या काळातील थकीत अनुदान देखील मार्गी लावून शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम स्वरूपात तयार करून शेतकऱ्यांना ई-केवायसी व आधार लिंकिंग करून घेण्यास प्रवर्त करून अनुदानाची लवकरच वाटप करण्यात येणार आहे.

हे पण वाचा :- अखेर दुष्काळ अनुदान जाहिर ; २ ऐवजी ३ हेक्टेरच्या मर्यादेत मिळणार अनुदानाची रककम..!

या जिल्ह्यांच्या पिक विम्याला अखेर मंजुरी.

राज्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये 2022 चा पिक विमा मंजूर झाला होता परंतु पिक विमा कंपनीने राज्य शासनाच्या निधीचे कारण सांगून काही मंडळांना पिक विम्याचे वितरण केले नाही. याबरोबरच यवतमाळ, गडचिरोली व अमरावती या जिल्ह्यातील थकीत पिक विमा साठी 231 कोटी रुपयांचा निधी आजच्या शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आला आहे.Pik Vima Yojana 2022-23.

या जिल्ह्यांना होणार तात्काळ अनुदानाचे वाटप.

आजच्या शासन निर्णयानुसार समूह क्रमांक 9 मध्ये यवतमाळ, अमरावती, गडचिरोली व धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो व या जिल्ह्यांसाठी 180 कोटी रुपये व समूह क्रमांक 10 मध्ये केवळ धाराशिव जिल्हा आहे व या जिल्ह्यासाठी 50 कोटी रुपये असे एकंदरीत 2022 च्या रब्बी व खरीप हंगामासाठी 231 कोटी 28 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत जे की लवकरच बँक खात्यामध्ये देखील जमा होणार आहेत.

हे पण वाचा :- राज्य शासनाव्दारे कर्जमाफीची घोषणा ; या शेतकऱ्यांचे होणार सरसकट कर्ज माफ,पहा कर्जमाफीची सविस्तर यादी..!

कधीपर्यंत मिळणार अनुदानाची रक्कम.

सध्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी पिक विमा योजना ही कप अँड कप मॉडेल अर्थात बीड पॅटर्ननुसार पिक विमा योजना राबवली जात आहे. 2020 मध्ये राज्यात पिक विमा योजना राबवली जात असताना बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने पीक विम्याची वाटप झाले त्याच पद्धतीने आज शासन निर्णयाद्वारे निधी मंजूर करण्यात आलेल्या जिल्ह्यांसाठी येत्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आधीच या पीक विम्याच्या अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये मिळून जाईल.Pik Vima Yojana 2022-23.

Leave a Comment