Pik vima yojana 2023 या जिल्ह्यातील पिक विमा नुकसान भरपाईच्या लाखो पूर्वसूचना फेटाळल्या, पहा संपूर्ण यादी.

WhatsApp Group Join Now

Pik vima yojana 2023 महाराष्ट्र राज्यामध्ये मागील नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस गारपीट व चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. व या नुकसानीचे शेतकऱ्यांनी पंचनामे करून पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी पूर्व सूचना दाखल केल्या होत्या, परंतु पिक विमा कंपनीने लाखो शेतकऱ्यांच्या पिक विमा नुकसान भरपाईच्या पूर्व सूचना फेटाळले आहेत.

या जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या पूर्व सूचना फेटाळल्या.

Pik vima yojana 2023  राज्यातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी व अवकाळी पाऊस गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे फळ पिकांचे व शेती पिकांचे नुकसान झाले. व या काळात नुकसान झालेल्या 6 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. व या पूर्वसूचना पिक विमा कंपनीकडून भेटल्यामुळे शेतकऱ्यांमधून आक्रोश व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा :- अर्थसंकल्पीय अधिवेशन घोषणा ; अवकाळी पाऊस अनुदानासह दूध अनुदानासाठी निधीची तरतूद..!

शेतकऱ्यांकडून पिक विमा कंपनीबाबत सरकारकडे तक्रार.

अतिवृष्टी पूरपरिस्थिती आणि चक्रीवादळ यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या पूर्वसूचनांपैकी तीन लाख शेतकऱ्यांना 230 कोटी रुपयांची आर्थिक मदत देत उर्वरित तीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या पूर्व सूचना फेटाळल्या. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडून देखील पिक विमा वितरणाची मागणी केल्यानंतर देखील पिक विमा कंपन्यांनी अनुदानाचे वितरण करण्यास नकार दिला असल्यामुळे शेतकऱ्यांकडून पिक विमा कंपनी बाबत सरकारकडे तक्रार दाखल करण्यात येत आहे.

पिक विमा अंतर्गत शेतकऱ्यांना विम्याची कवच.

अतिवृष्टी, गारपीट चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या शेती पिकांच्या होणाऱ्या नुकसानीचे संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येते. पूर्वी योजनेअंतर्गत अधिक पैसे देऊन पिक विमा उतरवला जायचा परंतु आता केवळ एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना राज्य सरकारच्या मार्फत राबविण्यात येत आहे. केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विम्याचे कवच देण्यात येत आहे.Pik vima yojana 2023.

या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा.

यवतमाळ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे सादर केलेल्या पूर्व सूचनांपैकी कंपनीमार्फत फेटाळण्यात आलेल्या शेतकऱ्यांना अद्याप देखील पिक विमा ची प्रत्यक्ष आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील तीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अतिवृष्टी नुकसान भरपाई चे वितरण करण्याची अपेक्षा आहे. Pik vima yojana 2023.

 

Leave a Comment