Pik vima yojana 2023 आधार कार्ड लिंक नसल्यामुळे २.५ लाख बॅंक खात्यात विमा जमा होण्यास अडचणी.

WhatsApp Group Join Now

Pik vima yojana 2023 गेल्या वर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसाच्या अनुदानाच्या सरसकट वितरणाला राज्य सरकारने सुरुवात केली आहे आणि या नुकसान भरपाईच्या वितरणासाठी २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची तरतूद केली आहे. परंतु राज्यातील भरपूर साऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे ही रक्कम त्यांच्या खात्यात वितरित करण्यास अडथळे निर्माण होत आहेत आणि याबद्दल राज्य शासनाने एक आवाहन करून या शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड लिंक करण्याचे निवेदन केले आहे.

अनुदानाची रक्कम वितरित करण्यास बँका असमर्थ.

शेतकऱ्यांना वारंवार सूचना करून देखील बँक खात्याशी वैयक्तिक आधार कार्ड संलग्न न केल्यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मंजूर अनुदानाची रक्कम वितरित करण्यास बँका असमर्थ आहेत.Pik vima yojana 2023

हे पण वाचा :- पुढील ५ दिवसात देशासह या राज्यात अवकाळी पावसाची शक्यता ; आंबा पिकाला मोठा धोका..!

मागील काही दिवसांमध्ये राज्यातील प्रत्येक गावामध्ये राज्य सरकार द्वारे एक विशेष मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत च्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही ते लिंक करून देण्यात येत होते त्यामुळे या लाभार्थ्यांना पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसोबत राज्य शासनाच्या इतर देखील सर्व योजनांचा लाभ घेता यावा.

2023 च्या पिक विम्याच्या वितरणाला सुरुवात.

खरीप 2023 हंगामात पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करण्याचे काम आटोपले आहे आणि या हंगामातील जवळपास ५२.७३ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २३३० कोटी रुपयांची रक्कम राज्य सरकारने मंजूर केली आहे.Pik vima yojana 2023

हे पण वाचा :- या जिल्ह्यांना 2023 च्या नुकसान भरपाई चे वितरण चालू ; पहा सविस्तार यादी ..!
आधार लिंक नसलेल्या लाभार्थ्यांचे वितरण बाकी.

जानेवारी 2024 पर्यंत राज्यातील ४९.५८ लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये २२४३ कोटी रुपये जमा करण्यात आले असून, बँका खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे उर्वरित पावणे दोन लाख शेतकऱ्यांच्या हिश्याची मंजूर रक्कम वितरित करणे बाकी आहे. Pik vima yojana 2023 व या लाभार्थ्यांनी बँक खात्याला आधार कार्ड लिंक केल्यानंतर ही रक्कम देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

या शेतकऱ्यांसाठी विशेष निधीचे नियोजन.

राज्यातील १.३३ लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना उर्वरित पीक विम्याची रक्कम आणखीन देखील मिळालेले नाही कारण की या शेतकऱ्यांना अनुदानाची मंजूर रक्कम ही एक हजार रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे या शेतकऱ्यांसाठी राज्य शासन विशेष निधीचे नियोजन करत आहे.

 

Leave a Comment