शेतकऱ्यांनो चिंता नको..! आचारसंहिता असली तरी या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम मिळणार. Pik vima yojana 2024.

WhatsApp Group Join Now

Pik vima yojana 2024.महाराष्ट्राच्या सह देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे, सरकारची व इतर प्रशासकीय कामे आता ठप्प होतील. परंतु राज्यातील ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या निवडणुकीच्या अगोदर अतिवृष्टी किंवा पिक विमा तसेच इतर कोणत्याही शेतकरी अनुदानाला मंजुरी मिळाली असेल ते अनुदान या आचारसंहितेमध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाईल अशा प्रकारची हमी भाजपाच्या आमदाराने दिली आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पीक विम्याची वाटप.

खरीप हंगाम 2022 मधील अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या अनुदेय अनुदानापासून वंचित राहिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील सहा मंडळातील शेतकऱ्यांना येत्या आठवडाभरात अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या अनुदानाची रक्कम बँक खात्यात वितरित केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. Pik vima yojana 2024.

हे पण वाचा :- कापूस उत्पादकांसाठी खुशखबर..! कापसाला मिळतोय 8000 रुपयांच्या वर भाव, पहा आजचे कापुस बाजार भाव..!

राणाजगजीतसिंह यांच्याकडुन महत्वपूर्ण माहिती.

धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळणे अपेक्षित आहे. व कृषी आयुक्त कार्यालयाकडे जमा असलेली पिक विम्याची रक्कम सोमवारी पिक विमा कंपनीच्या खात्यावर वर्ग होण्याची शक्यता असल्याने, धाराशिव जिल्ह्यातील सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 50 कोटी रुपयाच्या नुकसान भरपाई च मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी दिली.

शेतकऱ्यांना मिळणार 2022 चा उर्वरित पिक विमा.

खरीप हंगाम 2022 मध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी चक्रीवादळ व पूर परिस्थिती यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने 50% भारांकण लावून नुकसान भरपाई चे वाटप केले होते. 2022 मधील नुकसान भरपाई साठी 282 कोटी एवढ्या एकूण अनुदय रकमेपैकी 230 कोटी रुपयाचे वाटप झाले असून उर्वरित 50 कोटी रुपये वितरित करण्यास देखील पिक विमा कंपनीने आता सहमती दर्शवली आहे. Pik vima yojana 2024.

कधी व कशाप्रकारे मिळेल हा पिक विमा.

राज्यसह संपूर्ण देशामध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळे सरकारी व प्रशासकीय सर्व कामे बंद असल्यामुळे या आचारसंहितेच्या वेळेस ही रक्कम शेतकऱ्यांच्य बँक खात्यात जमा केली जाऊ शकते का? तसेच आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पिक विमा कंपनीने सहमती दर्शवून या आचारसंहितेच्या वेळेसच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment