Pik VimaYojana 2023 या जिल्ह्यांतील सव्वा लाख शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई जाहीर- कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा.

WhatsApp Group Join Now

Pik VimaYojana 2023 राज्यात 2023 च्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला वेळेवर पाऊस न झाल्याने व त्यानंतर अतिवृष्टी व चक्रीवादळ यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाने आज निधी वितरित करण्यास परवानगी दिली आहे.तर मग कोणत्या जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर केला आहे व या निधीचे वितरण कशाप्रकारे करण्यात येणार आहे हे आजच्या लेखात सविस्तरपणे जाणून घेऊया.

लाखो शेतकरी विमा पासून वंचित.

राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा पिक विमा जास्तीत जास्त भरावा यासाठी केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा योजना जाहीर केली. व 31 मार्च 2023 पर्यंत या अंतर्गत पिक विमा भरायचा होता. परंतु योजनेत शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता योजनेची तारीख 3 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. तरीसुद्धा खेडेगावात व डोंगराळ भागातील शेतकऱ्यांपर्यंत योजनेची अंमलबजावणी न झाल्यामुळे व काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना विमा भरण्यास निर्माण झालेल्या अडचणीमुळे या योजनेपासून लाखो शेतकरी वंचित राहणार आहेत.Pik VimaYojana 2023.

हे पण वाचा :- आधार कार्ड काढणे, अपडेट करणे सर्व सुविधा आता पोस्ट ऑफिस मध्ये मोफत मिळणार..!

जिल्ह्यातील विम्याची सद्यस्थिती.

पुणे जिल्ह्यामध्ये 2023 च्या खरीप हंगामाचा दोन लाख 28 हजार 441 शेतकऱ्यांनी विमा भरला. त्या अंतर्गत एक लाख 27 हजार 331 हेक्टर क्षेत्र विम्याखाली आले. व या पिक विमा योजने अंतर्गत सर्वाधिक विमा शिरूर तालुक्यातील 39 हजार 976 शेतकऱ्यांनी भरला.

पुणे जिल्ह्याची विमा वितरणाची सद्यस्थिती.

Pik VimaYojana 2023 पुणे जिल्ह्यामध्ये खरीप पिक विमा योजना 2023 अंतर्गत सहभागी झालेल्या एकूण दोन लाख 28 हजार 441 शेतकऱ्यांपैकी एक लाख 25 हजार 660 शेतकऱ्यांना 42 कोटी 13 लाख 9 हजार रुपयांची नुकसान भरपाई वाटप करणे मध्ये आली होती. व अजूनही एक लाख 2 हजार 841 शेतकऱ्यांना पिक विम्याची मदत मिळणे बाकी आहे.

हे पण वाचा :- महिलांवर पैशांचा पाऊस ; महिलांना मिळणार हवे तेवढे कर्ज..!

या शेतकऱ्यांना व या पिकांसाठी पिक विमा मंजूर.

हंगामातील जून व जुलै महिन्यामधील भात, नाचणी, बाजरी, भुईमूग, ज्वारी, तूर, उडीद, मूग या पिकांसाठी पिक विमा योजना राबवण्यात आली. व या योजनेअंतर्गत कर्जदार, बिगर कर्जदार व भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसान साठी अनुदानाची मदत देण्यात येणार आहे.Pik VimaYojana 2023.

पुणे जिल्ह्यातील तालुका निहाय मंजूर निधी.
तालुका  शेतकरी संख्या  मंजूर रक्कम  ( लाखात )
हवेली  1399 19.20
खेड  15335 660.31
आंबेगांव  13944 423.67
जुन्नर  27793 1385.88
शिरूर  24533 497.29
पुरंदर  13307 225.00
दौंड  2792 54.26
बारामती  19430 669.54
इन्दापुर  7075 253.67
एकुण  125600 4213.9

 

Leave a Comment