PM E-BUS SEWA SCHEME मंत्रिमंडळ बैठक निर्णय ; आता या शहरातही चालणार इलेक्ट्रिक बस सुविधा.

WhatsApp Group Join Now

PM E-BUS SEWA SCHEME राज्य सरकार पेट्रोल डिझेलवर होणारा खर्च कमी करण्यासाठी व या इंधनामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. यामध्ये इलेक्ट्रिक मोटरसायकल, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार व इलेक्ट्रिक बसेस निर्माण करण्यास व त्यांचा वापर करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करीत आहे. व याच धोरणावर आधारित आता राज्यातील या काही प्रमुख शहरांसाठी राज्य सरकारने इलेक्ट्रिक बसेस चालू करण्याचा निर्णय घेतला आहे तर मग प्रशासन निर्णयाद्वारे कोणत्या शहरांना या इलेक्ट्रिक बसेस मिळतील व यांद्वारे प्रवास करण्यास काय सवलती असतील याबद्दल सविस्तरपणे आजच्या लेखात जाणून घेऊया.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय.

काल महाराष्ट्र राज्य शासनाच्या पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये , महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र शासनाच्या पुरस्कृत “पी एम ई-बस सेवा” ( PM E-BUS SEWA ) योजनेचे अंमलबजावणी करण्यात मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

हे पण वाचा :- अखेर राज्य सरकारने जाहीर केले की, नमोचा दुसरा हाप्ता 6000 रुपयांचाच मिळणार..!

PM E-BUS SEWA योजनेचे उद्दिष्टे.

देशभरामधील परिवहनच्या सेवेत सुधारणा करून देशात उद्भवत असलेल्या हवेच्या प्रदूषणावर आळा घालणे व पर्यावरण पूरक शाश्वत उपाय योजना करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिनांक 16 ऑगस्ट 2023 पी एम ई-बस सेवा ( PM E-BUS SEWA ) ही योजना जाहीर केली. व देशातील 10 ते 15 टक्के वाहने विजेवर चालवण्याचे देखील केंद्र सरकारचे उद्देश आहे.

या शहरात सुरू होणार ई-बस सेवा.

PM E-BUS SEWA SCHEME पी एम ई-बस सेवा अंतर्गत देशातील 169 महत्वपूर्ण शहरांमध्ये बस सेवा सुरू केली असून, या FAME योजनेअंतर्गत समाविष्ट असलेले मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई ही महत्त्वाची शहरे वगळता राज्यातील 23 महानगरपालिकांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये चालेंज पद्धतीवर 19 शहरांचा समावेश करण्यात आला असून या शहरात प्रथमता ई-बस सेवा राबवली जाणार आहे.

हे पण वाचा :- आजचे मंत्रिमंडळ निर्णय ; धान बोनस जाहीर,अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजुर,नमोचा हाफ्ता आला..!

अशाप्रकारे मिळणार ई-बसचा प्रवाशांना लाभ.

केंद्र शासनाकडून योजनेची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून यासाठी खाजगी सेवा पुरवठा दराची निवड करण्यात येत आहे. ई-बसची सुविधा संबंधित शहरांमध्ये अखंडित सुरू राहावी यासाठी सेवा पुरवठा दराने दिलेल्या सेवेच्या देयकांची हमी देणारी प्रणाली देखील केंद्र शासनाकडून विकसित करण्यात येत आहे.

ई-बस मध्ये तीन बसेसचा समावेश असणार.

या पीएम ई-बस योजनेअंतर्गत संबंधित शहराच्या बाजूने नुसार केंद्र सरकार तीन प्रकारच्या बस पुरवणार आहे. यामध्ये स्टॅंडर्ड बस,मिडी बस व मिनी स्टॅंडर्ड बस या बसेसचा समावेश आहे. योजनेतील बसेसच्या प्रकारानुसार व किलोमीटरच्या आकारणे प्रवाशांकडून तिकीट आकारले जाणार आहेत.

पी एम ई-बस योजनेतील अनुदानाची पद्धत.

पी एम ई-बस योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून बस प्रकार निहाय प्रति किलोमीटर अंतरासाठी ठराविक अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार असून, योजनेसाठीचा उर्वरित खर्च संबंधित शहरांनी बस तिकिटावरून व इतर महसुली उत्पन्नातून भागवायचा आहे. या योजनेअंतर्गत बसेस साठी ऊर्जेच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून 100 टक्के केंद्रीय अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.PM E-BUS SEWA SCHEME.

Leave a Comment