PM KISAN 16TH INSTALLMENT NEWS शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; पी एम किसानचा हाप्ता 28 फेब्रुवारीला 4000 रुपयांचा जमा होणार.

WhatsApp Group Join Now

PM KISAN 16TH INSTALLMENT NEWS राज्यातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला पी एम किसानच्या सोळाव्या हप्त्याच्या तारखे बद्दलची अपडेट मिळालीच असेल परंतु या अपडेट सोबत आता पीएम किसानच्या काही लाभार्थ्यांना हा सोळावा हाप्ता 4000 रुपयांचा देखील मिळणार आहे.

पी एम किसानचा सोळावा हप्ता या ठिकाणाहून जमा होणार.

PM KISAN 16TH INSTALLMENT NEWS पी एम किसान सन्माननिधी च्या पात्र लाभार्थ्यांना योजनेच्या आगामी सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती व काल केंद्र सरकारने पीएम किसान च्या अधिकृत पोर्टलवर दिलेल्या अपडेट नुसार योजनेचा सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 11:30 मिनिटाला महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.

हे पण वाचा :- निर्यात बंदीच्या अफवेमुळे कांद्याचे भाव घसरले ; दरात प्रतिक्विंटल 1000 रुपयांची घसरण..!

नमोच्या दुसऱ्या हप्त्याचे देखील होणार वितरण.

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे देखील आता वितरित करण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाने काल एक शासन निर्णय निर्गमित करून दुसऱ्या हाप्त्याच्या वितरणासाठी 1792 कोटी रुपये मंजूर केले आहेत.PM KISAN 16TH INSTALLMENT NEWS.

असा मिळणार सोळावा हप्ता 4000 रुपयांचा.

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली व पी एम किसान योजनेचे सर्व निकष आणि नियम या योजनेस लागू केले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे यापुढे नमोचे प्रत्येक हप्ते पीएम किसानच्या हप्त्यासोबत वितरित केले जातील त्यामुळे जर नमो शेतकरी चा दुसरा हप्ता या पीएम किसान च्या सोळाव्याहत्या सोबत वितरित केला तर महाराष्ट्र राज्यातील पी एम किसानच्या पात्र लाभार्थ्यांना 4000 रुपयांचा आर्थिक लाभ मिळेल.

हे पण वाचा :- अखेर केंद्र सरकारने जाहीर केले की फेब्रुवारीच्या किती तारखेला सोळावा हप्ता जमा होणार ; जाणून घ्या तारीख.

योजनेचा लाभ घेण्यासाठी या गोष्टी बंधनकारक.

पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर पी एम किसानच्या सोळाव्या हाप्त्याच्या तारखे बरोबर योजनेच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला काही गोष्टी पूर्ण असणे बंधनकारक असल्याची माहिती दिली. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थ्याची ई-केवायसी पूर्ण असावी, त्याच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावे व आधार सीडींग देखील पूर्ण असावे तसेच लाभार्थ्याच्या भूमी अभिलेख नोंदी देखील अद्यावत असणे गरजेचे आहे. या तिन्ही गोष्टी पूर्ण असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात या दोन्ही योजनांच्या हाप्त्याचे पैसे जमा केले जातील.PM KISAN 16TH INSTALLMENT NEWS.

Leave a Comment