PM KISAN & NAMO SHETHKARI YOJANA उद्या दुपारी १ वाजता मोदिजींच्या हस्ते होणार एकत्र ६००० रुपयांचे वितरण.

WhatsApp Group Join Now

PM KISAN & NAMO SHETHKARI YOJANA केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महाराष्ट्र राज्य मधील 87 लाख 96 हजार पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्यापोटी 1943 कोटी 46 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्या म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत.

नमोच्या दोन्ही हप्त्याचे पैसे एकाच वेळेस.

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत देखील राज्यातील पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना एकत्र दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची वितरण या सोळाव्यामध्ये सोबत पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.PM KISAN & NAMO SHETHKARI YOJANA.

व या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3792 कोटी रुपये एकाच वेळेस जमा करण्यात येणार आहेत.

हे पण वाचा :- आजचे मंत्रिमंडळ निर्णय ; धान बोनस जाहीर,अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजुर,नमोचा हाफ्ता आला..!

राज्यातील या जिल्ह्यातून होणार हाप्त्याचे वितरण.

उद्या म्हणजे 28 फेब्रुवारी 2020 रोजी महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक विशिष्ट कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला काही केंद्रीय मंत्र्यांसोबत महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती असणार आहे.

आणि याच कार्यक्रमातून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या सोळाव्या आणि नमो शेतकरी च्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे एकत्र वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात महाडीबीटी च्या माध्यमातून करण्यात येणार आहे.PM KISAN & NAMO SHETHKARI YOJANA.

हे पण वाचा :- मंत्रिमंडळ बैठक निर्णय ; आता या शहरातही चालणार इलेक्ट्रिक बस सुविधा..!

28 फेब्रुवारी हा किसान दिवस म्हणून साजरा होणार.

राज्यातील गावोगावी 28 फेब्रुवारी हा दिवस किसान दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गोदाम यांनी कृषी विभागाच्या जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना उद्याचा दिवस किसान दिवस म्हणून साजरा करावा असे आवाहन केले आहे.

त्यानुसार गाव पातळीवरील कृषी विज्ञान केंद्र व सामायिक सुविधा केंद्र या ठिकाणी उत्साहात किसान दिवस साजरा करण्यात येणार आहे.

Leave a Comment