Pm kisan new update पी एम किसान योजनेच्या निकषांमध्ये बदल आता यांनाही मिळणार पुढील हप्त्यांचा लाभ.

WhatsApp Group Join Now

Pm kisan new update पी एम किसान योजनेच्या नियमानुसार जे शेतकरी आयकर विभागाचा कर भरतात अशा लाभार्थ्यांना योजनेच्या अनुदानाचा लाभ देण्यात येत नव्हता, परंतु योजनेत नवीन बदल करून नवीन निकषानुसार आता अशा लाभार्थ्यांना देखील योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ देण्यात येणार आहे. तर मग या महत्वपूर्ण बदलांबरोबरच इतर कोणते बदल योजनेत केले आहेत आणि पुढील हप्ता पात्र लाभार्थ्यांना कधी मिळेल आजच्या लेखामध्ये सविस्तरित्या जाणून घेऊया.

पीएम किसान योजनेमध्ये मोठे अपडेट.

ज्या शेतकऱ्यांनी बँकांकडून पीक कर्ज घेण्यासाठी विवरण पत्र ( फॉर्म-१६ ) व आर्थिक विवरण पत्र भरून घेतली आहे हे शेतकरी आयकर विभागाच्या मर्यादेमध्ये येत होते. व योजनेच्या नियमानुसार हे लाभार्थी योजनेस अपात्र होते त्यामुळे अशा लाभार्थ्यांकडून योजनेअंतर्गत च्या हप्त्याच्या रकमेची वसुली देखील करण्यात आली. Pm kisan new update.

हे पण वाचा :- अवकाळी पावसाने झोडपले ; पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना वादळी..!
केंद्र सरकारकडून योजनेत नवीन बदल.

Pm kisan new update ज्या शेतकऱ्यांनी शेती कर्जासाठी केवळ एक वेळेस आर्थिक विवरण पत्र भरलेले असेल अशा शेतकऱ्यांना आता मागील थकीत हफ्त्यांसहित या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करण्यात येणाऱ्या सोळाव्या हप्त्याचा देखील लाभ देण्यात येणार आहे.

असे आहेत योजनेचे बदललेले निकष.

केंद्र सरकारने आता ज्या शेतकऱ्यांनी एक वेळेस आर्थिक विवरण पत्र भरून आयकर भरला असेल अशा शेतकऱ्यांना योजनेस पात्र करून मागील थकीत हफ्त्यांसह पुढील हप्त्याचा देखील लाभ देण्यात येणार आहे.

तसेच आर्थिक वर्ष 2019 पासून ज्या शेतकऱ्यांनी दोन वेळेस आयकर भरला आहे , त्यांना मात्र योजनेचा लाभ मिळणार नाही.

पी एम किसान योजना ही कृषी विभागाची योजना असली तरी आयकर वसुली आणि आयकर नियंत्रण हे महसूल विभागाकडे आहे .

आणि या नियमांमुळे योजनेस अपात्र झालेल्या लाभार्थ्यांना पुन्हा पात्र करून योजनेअंतर्गत समावेश करण्यासाठी सध्या योजनेच्या पोर्टलमध्ये महत्त्वाचे अपडेट करण्यात येत आहे.Pm kisan new update

हे पण वाचा :- मुलींचे उच्च शिक्षण झाले मोफत ; सरकार भरणार १०० टक्के फीस..!
सोळावा फक्त या दिवशी मिळणार.

आज केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या महत्त्वपूर्ण अपडेट मध्ये नमूद केल्याप्रमाणे पी एम किसान योजनेचा पुढील सोळावा हप्ता देशातील सर्व पात्र लाभार्थ्यांना या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. आणि हा हप्ता याच महिन्यात वितरित करण्यामागील कारण म्हणजे पुढील काळात देशात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका.

Leave a Comment