Pm Kisan Pending Installment या नंबर वर कॉल करा आणि मिळवा पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे मागील हफ्ते

WhatsApp Group Join Now

Pm Kisan Pending Installment  राज्यातील पीएम किसान योजनेअंतर्गत च्या पात्र लाभार्थ्यांना सोळाव्या हफ्त्याचे व नमो शेतकरीच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करून 8 ते 10 दिवस झाले तरी देखील अजून पण राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत. व अशा शेतकऱ्याकडून सतत हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की आम्हाला या हप्त्याच्या रकमेचा लाभ कसा मिळेल याची तक्रार कुठे करायची याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

तुम्हाला पी एम किसान चा 16 हप्त्याचे पैसे का मिळाले नाहीत.

Pm Kisan Pending Installment पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी केंद्र शासनाने ज्या अटी किंवा शर्ती ठेवल्या आहेत या अपूर्ण राहिल्यामुळे राज्यातील किंवा देशातील भरपूर साऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 28 फेब्रुवारी 2024 रोजी पी एम किसान योजनेचा वितरित केलेला सोळावा हप्ता जमा झाला नाही. यामध्ये तुमची ई-केवायसी, आधार शेडिंग, लँड शेडिंग या बाबींचा समावेश होतो.

📢 हे पण वाचा :- राज्य शासनाची नवीन योजना ; शेतकऱ्यांना मिळणार दिवसा 24 तास वीज आणि 25000 रोजगार पण..!

तुम्हाला नमो शेतकरी चे हफ्ते का जमा झाले नाहीत.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेसाठी पीएम किसान योजनेचे सर्व नियम आणि निकष लागू आहेत. व नमो शेतकरी ही नवीन योजना असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आता नव्याने योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल त्यांचे माहिती अपडेट होण्यास योजनेअंतर्गत वेळ लागत असल्यामुळे या लाभार्थ्यांना नमोचा दुसरा किंवा तिसरा हप्ता जमा झाला नाही.Pm Kisan Pending Installment.

पी एम किसान च्या हप्त्यांची येथे करा तक्रार.

जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असाल परंतु तुमच्या खात्यामध्ये योजनेचा सोळावा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही
pmkisan-ict@gov.in किंवा pmkisan-funds@gov.in या केंद्र शासनाच्या ईमेल आयडीवर तुमची तक्रार दर्ज करू शकता.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! राज्य सरकारची आणखिन २ लाख सौर कृषि पंपाची घोषणा.पहा संपूर्ण बातमी..!

या नंबर वर कॉल करून हप्त्याचे अनुदान मिळवा.

पी एम किसान योजनेच्या व नमो शेतकरी योजनेच्या न मिळालेल्या हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी हवे असल्यास तुम्ही पी एम किसान च्या हेल्पलाइन नंबर वर म्हणजे
011-24300606 किंवा 155261 कॉल करू शकता किंवा पी एम किसान च्या व नमो शेतकरी योजनेच्या अधिकारी टीमशी बोलण्यासाठी 1800-115-526 या नंबर वर कॉल करून हप्त्याचे अनुदान मिळू शकतात.Pm Kisan Pending Installment.

Leave a Comment