खुशखबर..! पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज करून मोफत वीज मिळवा व महावितरणला वीज विकून पैसे कमवा, आजच अर्ज करा. PM Saur Ghar Yojana.

WhatsApp Group Join Now

PM Saur Ghar Yojana. प्रधानमंत्री सौर घर योजनेअंतर्गत देशांमध्ये प्रत्येक कुटुंबांच्या घरी सोलारचे पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकार वीज ग्राहकांना आर्थिक सहाय्य देणार आहे. एवढेच नाही तर या सोलर पॅनल द्वारे निर्माण झालेली अतिरिक्त वीज महावितरण ला विकून तुम्हाला पैसे देखील कमवता येणार आहेत. यामुळे देशातील घराघरात वीज पुरवठा होणार असून घरगुती वीज निर्मितीला चालना देखील मिळणार आहे.

काय आहे प्रधानमंत्री सौर घर योजना.

प्रधानमंत्री सौर घर योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक वीज ग्राहकाला आपल्या स्वतःच्या निवासी घराच्या छतावर एक किलोवॅट क्षमतेच्या सौर पॅनल प्रणालीसाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 60% रक्कम ही केंद्र शासनाकडून अनुदान स्वरूपामध्ये वीज ग्राहकदारांना देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री सौर घर योजनेचे फायदे.

PM Saur Ghar Yojana.प्रधानमंत्री सौर घर योजनेअंतर्गत एक किलो वॅट क्षमतेच्या सोलर पॅनल साठी एकूण खर्चाच्या 60 % रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाईल. तर दोन किंवा तीन किलो वॅट क्षमतेच्या सौर पॅनल साठी लागणाऱ्या खर्चाच्या 40% रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे. तसेच योजनेअंतर्गत जास्तीत जास्त अनुदानाची रक्कम ही 78 हजार रुपयापर्यंत असणार आहे.
📢 हे पण वाचा :-  शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळाचे शेतकऱ्यांसाठी 25 धडाकेबाज निर्णय, व निधी जाहीर.

प्रधानमंत्री सौर घर योजनेचे निकष.

प्रधानमंत्री सौर घर योजनेअंतर्गत प्रथमता पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब आणि सामान्य नागरिकांच्या कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यानंतर या नागरिकांच्या निवासी घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे. यामुळे या सामान्य गरीब प्रवर्गातील वीज ग्राहकांचे विज बिल शून्य रुपये येणार आहे.PM Saur Ghar Yojana.

योजनेसाठी या ठिकाणी करा नोंदणी.

प्रधानमंत्री सौर घर योजनेअंतर्गत आपल्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी तुम्हाला पोस्ट कार्यालयामध्ये नोंदणी करायची आहे.
केंद्र शासनाने या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वप्रथम राज्यातील गोरगरीब आणि सामान्य नागरिकांच्या कुटुंबाचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्यातील पोस्ट विभागाकडे दिली आहे.
व नवीन अपडेट नुसार आता पोस्ट विभागाकडूनच या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी देखील करण्यात येणार आहे.

योजनेच्या शर्ती अटी व आवश्यक कागदपत्रे.

प्रधानमंत्री सौर घर योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही महाराष्ट्राचे स्थायी नागरिक असायला हवे.
तुमच्याकडे ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र तसेच चालू वीज बिलाची प्रत, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, चालू मोबाईल नंबर, दोन पासपोर्ट साईज फोटो व घराचे घरपट्टी किंवा नळपट्टी इत्यादी कागदपत्रे असायला हवीत.
वरील सर्व कागदपत्रांसोबत तुम्हाला तुमच्या नजरेच्या पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज सादर करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या महावितरण कंपनीकडून पुढील प्रक्रिया पूर्ण करून घेऊन योजनेअंतर्गत च्या सोलर पॅनलचे वितरण आणि विस्थापन करून दिले जाईल.
एकदा तुमच्या छतावर सोलर पॅनल बसल्यानंतर लगेच काही दिवसांमध्ये तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्ये योजनेअंतर्गत ची सबसिडी म्हणजेच अनुदान केंद्र सरकारकडून जमा करण्यात येईल.PM Saur Ghar Yojana.

Leave a Comment